शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नकार असतानाही शिक्षण विभाग हलविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:18 IST

समिती आणि महासभेचे आदेश धाब्यावर; आयुक्तांच्या निषेधार्थ सभा तहकूब

कल्याण : केडीएमसी मुख्यालयातील शिक्षण विभागाचे कार्यालय हटविण्यास शिक्षण समितीने मनाई केली असताना, तसेच महासभेचे आदेश असतानाही आयुक्त गोविंद बोडके यांनी कार्यालय झोजवाला कॉम्प्लेक्समध्ये हलविले. आयुक्तांच्या या मनमानी कारभाराचा बुधवारी पार पडलेल्या शिक्षण समितीच्या सभेत निषेध करण्यात आला. जोपर्यंत आयुक्त निर्णय बदलत नाहीत, तोपर्यंत सभा होणार नाही, असे स्पष्ट करीत सभापती नमिता पाटील यांनी सभा तहकूब केली.स्मार्ट सिटीचे कार्यालय केडीएमसीच्या मुख्यालयात हलविण्याचा आणि तेथील कार्यरत असलेले काही विभाग अन्यत्र हलविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतला आहे. पण, मुख्यालयातील शिक्षण विभाग हटवू दिला जाणार नाही, असा पवित्रा सभापती पाटील यांनी जूनमध्ये झालेल्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभेत घेतला होता. तर, नुकत्याच झालेल्या महासभेतही शिक्षण विभाग हलविण्याचा हट्ट प्रशासनाने थांबवावा, असे सदस्यांनी सांगताना कार्यालय अन्यत्र हलविण्यास सक्त विरोध केला होता. यानंतरही आयुक्त बोडके यांनी हे कार्यालय सहजानंद चौकातील झोजवाला कॉम्प्लेक्समध्ये हलविले. त्याचे पडसाद बुधवारच्या शिक्षण समितीच्या सभेत उमटले.शिक्षण विभागाचे कार्यालय मुख्यालयातून हलविण्याच्या प्रशासनाकडून घडलेल्या कृतीचा सदस्य छाया वाघमारे यांनी निषेध केला. आयुक्तांच्या या एकाधिकारशाहीचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्यात यावी, अशी प्रस्ताव सूचना वाघमारे यांनी सभागृहात मांडली. यावर अन्य सदस्यांनीही आयुक्तांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षण समिती आणि महासभेने कार्यालय हटविण्यात येऊ नये, असे आदेश दिले असतानाही आयुक्तांनी कार्यालय हलविले, हे चुकीचे असल्याकडे सर्वांनी लक्ष वेधले. महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती सभापती, पालिकेचे गटनेते ही सर्व कार्यालये मुख्यालय परिसरात असताना शिक्षण विभागाचे कार्यालय हटविण्याबाबत आयुक्तांचा अट्टहास का, असाही सवाल सदस्यांनी केला.सभापती पाटील यांनी तर आयुक्तांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना जोपर्यंत आयुक्त आपला निर्णय बदलत नाही, तोपर्यंत सभा चालविली जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्याचबरोबर वाघमारे यांच्या सभा तहकुबीच्या प्रस्तावाला मान्यता देत सभा तहकूबकेली. आयुक्तांच्या कृतीबाबत उपायुक्त मिलिंद धाट यांनी खुलासा करावा, अशीही मागणी सदस्यांकडून करण्यात आली. त्यावर सदस्यांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहोचविल्या जातील, असे धाट यांच्याकडून सांगण्यात आले.सुषमा स्वराज यांना श्रद्धांजलीदरम्यान, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शिक्षण समितीच्या सभेत सभापती, सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या वतीने स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टॅग्स :Educationशिक्षण