शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जातीचे कारण देत पीडित तरुणीस लग्नासाठी नकार, तीन वर्षे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 04:12 IST

तरुणीचे महिला आयोगाला साकडे, जातीचे कारण केले पुढे

मुरबाड : तरुणीचे तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर तिच्या प्रियकराच्या आईवडिलांनी जातीचे कारण पुढे करून मुलाचे लग्न लावून देण्यास नकार दिल्याने आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या पीडितेने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. पोलीस यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने महिला आयोगाने दखल घेण्याची मागणी या तरुणीने केली आहे.

पीडित तरु णी आणि आरोपी महेश मोरेश्वर बांगर (वय ३०) यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाच्या आणाभाका घेऊन त्यांनी शरीरसंबंधदेखील ठेवले. दरम्यान, पीडित तरु णीच्या आईवडिलांनी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न निश्चित केले. या मुलासोबत तिचा साखरपुडादेखील झाला. यावर महेशने आक्षेप घेतला. आपण दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. तू त्या मुलाला नकार दे किंवा लग्नानंतरही तुला माझ्याशी शरीरसंबंध ठेवावे लागतील, अशी धमकी महेशने दिली. त्यामुळे तिने साखरपुडा झालेल्या मुलास नकार दिला. त्यानंतर, दोन वर्षे उलटली. मुलीला घरी किती दिवस ठेवणार, असा विचार करून आईवडिलांनी तिच्यासाठी दुसरे स्थळ पाहण्यास सुरु वात केली. मात्र, प्रत्येक स्थळाला मुलगी नकार देत असल्याने वैतागलेल्या पालकांनी तिला घराबाहेर काढले.

एकीकडे पालकांचे छत्र हरपले आणि दुसरीकडे प्रियकरही लग्नासाठी तयार नसल्याने पीडित मुलीची अवस्था दयनीय झाली.तिने थेट महेशचे घर गाठून त्याच्या आईवडिलांना महेशबद्दल विचारणा केली. त्याच्यासोबत तीन वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांची कल्पना देऊन लग्नाचा विषयही तिने महेशच्या आईवडिलांना सांगितला. ते ऐकून महेशचे आईवडील तिच्यावर संतापले. तू हलक्या जातीची आहेस, आम्ही सवर्ण आहोत. त्यामुळे हे लग्न होणार नसल्याचे सांगून त्यांनी मुलीला नकार दिला. सर्व दरवाजे बंद झाल्याने पीडित मुलीने महेशविरोधात अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.उपविभागीय पोलीस अधिकारी रजेवरच्मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे हे रजेवर असल्याने आरोपीविरुद्ध कारवाई होऊ शकली नाही.च्आरोपी मोकाट असल्याने आपल्या जीवितास धोका असल्याचा आरोप करत पीडित मुलीने महिला आयोगाला कारवाईसाठी साकडे घातले आहे. आयोग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाºयांकडे आहे. ते सध्या रजेवर आहेत. मात्र, आम्ही आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.- अजय वसावे,पोलीस निरीक्षक, मुरबाड

टॅग्स :thaneठाणेRapeबलात्कार