शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम संबंधास नकार: महिलेचे फोटो व्हायरल करणाऱ्यास अवघ्या काही तासांमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 19:53 IST

कासारवडवली भागात राहणा-या २५ वर्षीय महिलेशी आधी मैत्री करुन नंतर तिला त्याने प्रेमाच्या जाळयात ओढले. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी करीत ते त्याच्या बँक खात्यात भरण्यास तसेच रोख स्वरुपात देण्यास भाग पाडले. पैसे आणि प्रेमसंबंधालाही तिने नकार दिल्यानंतर मात्र त्याने त्यांचे एकांतवासातील फोटोही व्हायरल केले.

ठळक मुद्देठाण्याच्या कासारवडवली पोलिसांची कारवाईदोघांच्या एकांतवासातील फोटोही केले व्हायरल वारंवार होणा-या पैशांच्या मागणीमुळेच तिने तोडले होते संबंध

ठाणे: प्रेम संबंध ठेवण्यास तसेच पैसे पुरविण्यास नकार दिल्याने फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवर महिलेचे फोटो व्हायरल करणा-या व्यंकटेश पेंटा (२४, रा. बोरीवली) याला अवघ्या सहा तातांमध्ये अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. त्याला ५ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कासारवडवली भागात राहणाºया २५ वर्षीय महिलेशी आधी मैत्री करुन नंतर तिला त्याने प्रेमाच्या जाळयात ओढले. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी करीत ते त्याच्या बँक खात्यात भरण्यास तसेच रोख स्वरुपात देण्यास भाग पाडले. त्याच्याकडून होणाºया शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तसेच दिवसेंदिवस त्याची पैशांचीही मागणी वाढत असल्याच्या कारणावरुन या महिलेने त्याच्याशी प्रेमसंबंध तोडले होते. त्याच्याशी असलेले हे प्रेमसंबंध तोडल्याने आणि त्यास पैसे पुरविण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन व्यंकटेश याने फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅप या सोशल मिडियाच्या माध्यमातून माध्यमांद्वारे त्यांच्या दोघांचे काही खासगी फोटोही व्हायरल केले. तिचे फोटो व्हायरल करुन त्याने बदनामी केल्याने याप्रकरणी तिने ३० जुलै २०१९ रोजी विनयभंग, खंडणी, बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. तिने त्याच्याशी पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच पैशांच्या मागणीसाठी या महिलेकडे वारंवार संपर्क करीत होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप उगले, निरीक्षक वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, उपनिरीक्षक विनायक निंबाळकर, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, सुजित खरात, विश्वनाथ ध्रुवे आणि मनोजकुमार पवार आदींच्या पथकाने त्याला ३१ जुलै रोजी अटक केली. त्याने या गुन्हयाची कबूली दिली असून या संपूर्ण प्रकारामध्ये त्याचा सक्रीय सहभाग असल्याचेही उघड झाले. त्याने आणखी काही महिलांना अशाच प्रकारे फोटो व्हायरल करण्याचील धमकी दिली का? आणखी कोणाला प्रेमाच्या जाळयात ओढून त्यांना ब्लॅकमेल केले आहे का? याबाबत तपास सुरु असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी