शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरलाच डेंग्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:29 IST

केडीएमसीच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात साथीचे रोग नियंत्रणात आणण्याचे काम करणाºया डॉ. सीमा जाधव यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे.

कल्याण : केडीएमसीच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात साथीचे रोग नियंत्रणात आणण्याचे काम करणाºया डॉ. सीमा जाधव यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे.डॉ. सीमा या चिकणघर परिसरात साथ रोग नियंत्रणात तपासणीकरिता येणाºया रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्याचे काम करत होत्या. तीन दिवसांपासून ताप असल्याने त्या आजारी पडल्या. हा ताप डेंग्यूचा असल्याने त्यांना तातडीने कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे गटनेते व माजी महापौर रमेश जाधव यांची सीमा ही मुलगी आहे. सीमा यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे गटनेते जाधव यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत व वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांना कळवले आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. साधी त्यांची चौकशीही केली नसल्याचे गटनेते जाधव यांनी सांगितले.साथीचे आजार बळावले : परतीच्या पावसामुळे साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्याचीच शिकार डॉ. सीमा झाल्या आहेत. कल्याण पूर्वेला महापालिकेकडून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचा दावा गटनेते जाधव यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे जाधव यांनी सांगितले.महापालिकेच्या लेखा विभागातील अधिकारी श्वेता सिंगासने यांचा काही दिवसांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. मात्र, त्यांचा मृत्यू महापालिका हद्दीत झाला नाही, असे सांगून महापालिकेच्या आरोग्य विभागाने हात वर केले.

टॅग्स :thaneठाणे