शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग आणि मारहाणीच्या घटनेनंतर डिस्को पब-हुक्का पार्लर वर ठोस कारवाईसह बेकायदा बांधकाम तोडा 

By धीरज परब | Updated: May 27, 2024 12:16 IST

येथील बेकायदा बांधकाम वर कारवाईची मागणी होत आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या काशीमीरा नाका जवळील ए आर रेसिडेन्सी हॉटेल येथे असलेल्या गेट सेट नाईट ह्या डिस्को पब - बार कम हुक्का पार्लर मध्ये एका तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीच्या घटने नंतर पोलिसांनी येथील हुक्का पार्लरवर कारवाई चालवली आहे . परंतु सदर बारचे परवाने रद्द करण्या पासून ठोस कारवाई करा तसेच येथील बेकायदा बांधकाम वर कारवाईची मागणी होत आहे . 

काशीमीरा नाका जवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या ह्या जीएसटी पब डिस्को बार मध्ये सर्रास हुक्का चालतो . तसेच पहाटे पर्यंत येथे धुडगूस चालतो .tr एका राजकीय पक्षातील दलाल प्रवृत्ती आणि पोलिसांच्या संगनमताने ह्या अवैध प्रकार चालणाऱ्या पब वर कारवाई होत नसल्याचे आरोप केले जातात .  

त्यातच काही दिवसां पूर्वी सदर पब मध्ये एका ग्राहक महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्या प्रकरणी पबचा बाउन्सर आणि एका महिले विरुद्ध काशिगाव पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून टीकेची झोड आणि आरोपांच्या फैरी झडू लागल्याने  पोलिसांनी धाड टाकून बेकायदा हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी सामान जप्त करत मालक अक्षयकुमार प्रवीणकुमार जैन रा.  भाईंदर याच्यासह व्यवस्थापक मिथुन भवरलाल जैन, अमित मिश्रा , जतीन आणि आफास विरुद्ध ग्राहकांना हुक्का पिण्यास उपलब्ध केल्याप्रकरणी तसेच त्याचे सामान बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला . 

त्या नंतर देखील स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने बेकायदा हुक्का आदी सुरूच असल्याचे आरोप झाल्याने अमली पदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट -१ यांनी संयुक्त कारवाई हुक्का पुरवणारे १ मॅनेजर व ३ वेटर तसेच बार चालक, मालक यांच्या विरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला . 

या वरून स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट झालेच शिवाय ह्या पब - बार मधिल बेकायदा बांधकाम वा अंतर्गत बेकायदा बदल प्रकरणी कारवाई महापालिका देखील करत नसल्याचे आरोप होत आहेत . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी