शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरने पाणी पुरवण्याची मागणी, गेगाव आणि गायरानपाडा गावकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:02 IST

शहापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यावर तात्पुरता मार्ग म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यावर तात्पुरता मार्ग म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, तो पुरेसा नाही. त्यामुळे तो दररोज आणि पुरेशा प्रमाणात करण्याची नागरिकांची मागणी आहे.तालुक्यातील पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या गावांमध्ये वाढ झाली असून एक गाव गेगाव आणि गायरानपाडा या दोन्ही गावांच्या विहिरी कोरड्याठाक पडल्याने दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. सध्या गायरानपाड्याला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, या गायरानपाड्याला दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

गेगावातही टंचाईची समस्या निर्माण झाली असून या गावाची विहीर कोरडीठाक पडल्याने याही गावाला टँकरने पाणी पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही ही मागणी मान्य झालेली नाही. ती मान्य करून दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून यावेळी करण्यात आली आहे.

सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावाला यंदा पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. आजूबाजूला असलेल्या गावांना कधीही पाणीटंचाई निर्माण झाली, तरी गेगाववासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नव्हता. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावाला पाणीसमस्या सहसा जाणवत नव्हती. मात्र, यंदा लवकर गेलेल्या पावसाने ही समस्या निर्माण झाली आहे. यंदा तोही वेळेवर पडेलच, याची शाश्वती नसल्याने यावर्षी अधिक प्रमाणात पाणीसमस्या निर्माण होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावपाड्यात पाणीपुरवठा सुरू आहे. तो दररोज आणि पुरेसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

गायरानपाड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, तो दोनतीन दिवसांऐवजी दररोज करण्यात यावा, तसेच गेगावाला तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. - रमेश हुकमाळे, सेवा सोसायटी, उपाध्यक्ष

गेगाव येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर, मात करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. - नथू धोंडू पानसरे

ज्या गावांना पाणीसमस्या निर्माण झाली आहे, त्यांनी ग्रामपंचायतीचे ठराव दिल्यास त्यांना टँकरने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ते ठराव मंजुरीसाठी लगेचच पाठवले जातात. - एच.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई