शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडमार्क, कॉपीराईटचे उल्लंघन करून ऑनलाईन विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 15:24 IST

गेल्या वर्षी श्री वल्लभ मेटल्स ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील सेलो प्लास्टिक इंडस्ट्रियल वर्क ह्या कंपनीने मॅक्स फ्रेश हे नोंदणीकृत ट्रेडमार्क वापरून ऑनलाईन विक्री सुरूच ठेवल्याने कंपनी चालकांवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार भाईंदरच्या श्री वल्लभ मेटल्स कंपनीच्या वतीने मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे.

भाईंदर पूर्वेला औद्योगिक वसाहतीत श्री वल्लभ मेटलस् हि कंपनी असून ती पाण्याच्या बाटल्या , टिफिन डबे आदी विविध वस्तूंचे उत्पादन विक्री करते . सदर कंपनीने त्यांचा मॅक्स फ्रेश हा ट्रेडमार्क नोंदणीकृत केलेला आहे . तसे असताना सेलो कंपनीने त्यांचे टिफिन बॉक्स , बाटल्या आदी उत्पादने विकताना मॅक्स फ्रेश हा ब्रँड वापरल्याने त्या विरोधात गेल्या वर्षी श्री वल्लभ मेटल्स ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

दिल्ली उच्च न्यायालयाने सेलो कंपनीला मॅक्स फ्रेश ह्या ब्रँड नावाचा वापर करून नवीन उत्पादन करण्यास मनाई केली तसेच ३१ मार्च २०२४ पर्यंत त्यांच्या कडील मॅक्स फ्रेश ह्या नावाने असलेला वस्तूंचा साठा संपून टाकावा असे आदेश दिले होते . इतकेच नव्हे तर न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी सेलो कंपनीचे सीईओ मुकेश कोठारी यांना पुढील सुनावणीच्या तारखेला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे . तसेच उत्पादन वस्तू , जीएसटी भरणा आदींच्या माहितीसह शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे . 

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर देखील सेलो कंपनीने मॅक्सफ्रेश ट्रेडमार्कचा बेकायदा वापर सुरूच ठेवत कंपनीच्या संकेतस्थळ , अमेझॉन आदींवर ऑनलाईन वस्तूंची विक्री चालवली आहे . सेलो कंपनीच्या चालकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने कटकारस्थान करून जाणीवपूर्वक आमचा व न्यायालयाचा विश्वासघात करत आमच्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा गैरवापर चालवला आहे . आमच्या ट्रेडमार्कचा गैरवापर करून उत्पादन व विक्री करत आहेत . आमची फसववणूक केली आहे . त्यांनी  माहिती तंत्रज्ञानचा गैरवापर करत स्वतःची वेबसाईट तसेच अमेझॉन वेबसाईटवर आमच्या ट्रेडमार्क असलेल्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री चालवली आहे . आमचे आर्थिक नुकसान करत ट्रेडमार्क आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याने कंपनीचे मालक प्रदीप जी. राठोड, पंकज जी. राठोड, गौरव पी. राठोड व अमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी विनंती  वल्लभ मेटल्स कंपनीच्या वतीने लेखी तक्रार मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कडे शनिवार १५ जून रोजी केली आहे .

 तक्रार अर्ज सोबत न्यायालयाच्या आदेशाच्या प्रति तसेच सेलो कंपनीने मॅक्सफ्रेश ट्रेडमार्क वापरून उत्पादनांची ऑनलाईन विक्री करत असल्याचे पुरावे पोलीस उपायुक्तांना तक्रारी सोबत दिल्याचे कंपनीच्या वतीने नमूद करण्यात आले आहे .

टॅग्स :onlineऑनलाइनShoppingखरेदीmira roadमीरा रोड