शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्वान निर्बिजीकरण प्रकल्पामुळे झोपमोड, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे रहिवाशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:56 IST

कल्याण : पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण प्रकल्पात आणण्यात येणाºया कुत्र्यांच्या भूंकण्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोपमोड होते.

कल्याण : पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या श्वान निर्बिजीकरण प्रकल्पात आणण्यात येणाºया कुत्र्यांच्या भूंकण्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोपमोड होते. तसेच प्रकल्पातील दुर्गंधीचा सामनाही त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहरापासून दूर ठिकाणी हलवावा, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार महापालिका हद्दीत १९ हजार ६ भटके कुत्रे आहेत. या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी मागवलेल्या निवेदाला हैद्राबाद येथील ‘व्हेट्स सोसायटी फॉर अ‍ॅनिमल वेल्फेअर अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ या संस्थेने प्रतिसाद दिला. ८ जानेवारी २०१५ पासून ही संस्था महापलिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करत आहे. या कामासाठी संस्थेला निर्बिजीकरणापोटी महापालिकेकडून वर्षाकाठी ८० ते ९० लाख रुपये दिले जातात. आतापर्यंत संस्थेने १६ हजार ५१८ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. प्रत्यक्षात २०१२ मधील कुत्र्यांच्या गणणेनुसार अजूनही २ हजार ५९२ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण बाकी आहे. कंपनीने साधरणत: वर्षाला सरसरी अडीच हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे.कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला लागूनच हा प्रकल्प आहे. निर्बिजीकरणासाठी येथे कुत्रे पकडून आणले जातात. कुत्र्यांचे येथे भुंकणे सुरु असते. रात्रीच्या वेळी त्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रहिवाशांची झोपमोड होते. दुर्गंधीचा त्रासही त्यांना सहन करावा लागतो. श्वान निर्बिजीकरण प्रकल्प येथू हटवून शहराबाहेर न्यावा, अशी मागणी सूर्यमूखी, लोक सुरभी सोसायटीतील सदनिकाधारकांनी एप्रिलमध्ये निविदेद्वारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे केली आहे. त्यावर प्रशासनाने अजूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही.जनता दरबारातही मुद्दासोसायटीमधील रहिवासी हमीद शेख व सल्लाद्दीन खाटीक यांनी हा प्रश्न महापालिकेच्या जनता दरबारातही मांडला होता. त्यालाही प्रशासनाने दाद दिली नाही. या प्रकल्पाचा त्रास या परिसरातील रहेजा कॉम्पलेक्स, लोक उद्यान, शिव समृद्धी, चंद्रमुखी, सर्वोदय या सोसायट्यांमधील रहिवाशांना देखील होत आहे.श्वान प्रकल्पाच्या दुर्गंधीचा सामाना प्रकल्पाशेजारी असलेल्या बाजार समितीमधील फूल मार्केट, अन्नाधान्य बाजारालाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर कल्याण-शीळ रोडवरून मार्गक्रमण करणारे वाहन चालक व प्रवाशांनाही नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शहराच्या बाहेर हा प्रकल्प असावा, अशी मागणी रहिवासी वर्गाकडून केली जात आहे.

टॅग्स :dogकुत्राkdmcकल्याण डोंबिवली महापालिका