शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटनिर्मितीसाठी २० लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 21:39 IST

चित्रपट निर्मितीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणी मागणी मागणाऱ्या समीर महाजन याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसºया साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे आरोपीचा शोध सुरुच पुणे किंवा गुजराथकडे पळाल्याची शक्यतानौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाखांच्या खंडणीची मागणी करुन त्यातील एक लाखांची खंडणी उकळणा-या समीर महाजन (४७) याला अलिकडेच नौपाडा पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याचा दुसरा साथीदार बंटी सिंग हा चित्रपट निर्माता असून तो पोलिसांना हुलकावणी देत आहे. तो गुजराथमध्ये पसार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.राष्टÑ या मराठी चित्रपटाची निर्मिती करणाºया बंटीने या खंडणी प्रकरणामध्ये समीरला साथ दिल्याचा आरोप आहे. बंटी आणि नौपाड्यातील बांधकाम व्यावसायिक हसमुख सुरजी शाह (५०, रा. विष्णुनगर ,ठाणे) यांची ओळख एका जीममध्ये झाली होती. तुम्ही समीरला २० लाख रुपये देण्याऐवजी मला हे पैसे द्या. त्याद्वारे मला चित्रपटाची निर्मिती करता येईल, असा दावा बंटीने हसमुख यांच्याकडे केला होता. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही पैशांची मागणी केली होती. दरम्यान, शाह यांच्याकडे समीर महाजन यानेही २० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. शाह यांचे विष्णूनगर येथील एकदंत हाऊसिंग सोसायटीमध्ये तळमजल्यावर कार्यालय आहे. ते अनधिकृत असून त्याबाबत ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समिती कार्यालयात त्यांच्याविरुद्ध तक्र ार अर्ज करून अतिक्र मण विभागामार्फत कारवाई करेन, अशी समीरने धमकी दिली होती. मार्च २०१९ ते ५ फेब्रुवारी २०२० या काळात हा प्रकार सुरु होता. कारवाई नको असल्यास खंडणीची रक्कम द्यावी लागेल. खंडणी दिली नाहीतर तुला संपवतो. तसेच तुझ्या कुटूंबियांना खोटया केसमध्ये अडकवितो, असेही त्यांना धमकावले होते. शाह यांनी याप्रकरणी १३ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने २० लाखांमधील एक लाखांची रक्कम घेण्यासाठी शाह यांच्या कार्यालयात आलेल्या समीरला १३ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ अटक केली. त्याच्या दुसºया साथीदाराचाही शोध घेण्यासाठी एका पथकाची निर्मिती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली. त्याला लवकरच पकडण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी