शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

जुगार खेळताना आढळलेल्या आठ कर्मचाऱ्यांवर महावितरणाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 17:36 IST

लालचक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना जुगार खेळताना आढळलेल्या ८ कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

कल्याण: महावितरणच्या उल्हासनगर उपविभाग-४ अंतर्गत लालचक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना जुगार खेळताना आढळलेल्या ८ कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, एका कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांचे कोणतेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे महावितरणाने या कारवाईतून स्पष्ट केले आहे. 

वरिष्ठ तंत्रज्ञ टिकेकारा ओसेफ फ्रान्सिस, तंत्रज्ञ निखिल पांडुरंग पवार व महेश नारायण काळसईतकर, विद्युत सहाय्यक इलमोद्दीन मेहबूब शेख, संतोष मधुकर भोसले व मंगेश नंदू वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक विनोद तुकाराम बोबले तसेच कंत्राटी कामगार सुनील पांचाळ अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हे कर्मचारी लालचक्की शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता कक्षातील टेबलवर जुगार खेळताना आढळून आले होते. लालचक्की आणि व्हीनस शाखा कार्यालयात कर्तव्यावर असतानाही पैसे लावून कार्यालयातच जुगार खेळण्याचे या कर्मचाऱ्यांचे वर्तन गांभीर्याने घेत महावितरणने तडकाफडकी कारवाई केली.या कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन समाज माध्यमातूनही प्रसारित झाले असून, यातून महावितरणच्या प्रतिमेला हानी पोहोचली आहे. निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार, मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यावयाची आहे. कामावर असताना कर्मचाऱ्याचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यपूर्वक घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा यातून महावितरणने दिला आहे.