शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकातील प्रथमोपचार केंद्रात प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 00:38 IST

महिलेने कन्येला जन्म दिला असून मायलेक सुखरूप आहेत.

ठाणे : प्रसूतिवेदना सुरू झाल्याने रु ग्णालयाकडे निघालेल्या एका २३ वर्षीय महिलेची ठाणे रेल्वेस्थानकातील प्रथमोपचार केंद्रामध्ये (वन-रूपी क्लिनिक) मंगळवारी रात्री प्रसूती झाली. महिलेने कन्येला जन्म दिला असून मायलेक सुखरूप आहेत. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. रेल्वेप्रवासातील प्रसूतीची ठाणे रेल्वेस्थानकातील वर्षभरात घडलेली ही तिसरी घटना आहे.हरजित कौर हे या महिलेचे नाव असून ती दिव्याची रहिवासी आहे. मंगळवारी रात्री प्रसूतिवेदना सुरू झाल्याने ती नातेवाईकांसोबत दिव्यातून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे लोकलने जात होती. दरम्यान, ठाणे स्थानकात उतरल्यानंतर तिला प्रसुतीकळांचा त्रास वाढू लागल्या. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडे धाव घेऊन मदतीची विनंती केली. त्यानुसार रेल्वे उपप्रबंधक अपर्णा देवधर, पॉइंटमन मनीषा पाटले आणि लोहमार्ग पोलीसांनी तातडीने हालचाली करून तिला नातेवाइकांच्या मदतीने रेल्वेस्थानकातील प्रथमोपचार केंद्राच्या क्लिनिकमध्ये नेले. तिथे रात्री १०.१५ च्या सुमारास महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.रेल्वेप्रवासात प्रसूती होण्याची या वर्षभरातील ही तिसरी घटना आहे. ती लोकलमध्ये न होता स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात सुखरूपरीत्या झाली. मायलेकीला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.- सुरेंद्र महीधर,प्रबंधक, ठाणे रेल्वेस्थानकसंबंधित महिला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. रेल्वेस्थानकातील क्लिनिकमध्ये तिची नॉर्मल प्रसूती झाली असून दोघीही सुखरूप आहेत. अशी परिस्थिती असताना शक्यतो प्रवास करू नये. त्वरित जवळच्या रुग्णालयात जावे.- डॉ. राहुल घुले,सीईओ, वन-रूपी क्लिनिक

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाthaneठाणे