शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ स्पर्धकांकडूनच डिलीट

By admin | Updated: April 21, 2016 02:20 IST

गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी यंदा राबवण्यात आलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना पुरती फेल गेली आहे.

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेगुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी यंदा राबवण्यात आलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना पुरती फेल गेली आहे. ही संकल्पना युवकांपर्यंत पोहोचवण्यात आयोजकांना पुरेसे यश न मिळाल्याने तिला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून फक्त सात स्पर्धकांनी सेल्फी पाठवले आहेत. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या स्वागतयात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही स्पर्धा यंदा आयोजित करण्यात आली होती. स्वागतयात्रेनिमित्ताने दरवर्षी विविध स्पर्धा राबवल्या जातात. त्यात याही स्पर्धेचा समावेश होता. मात्र, ही संकल्पना अनेकांपर्यंत न पोहोचल्याने किंवा ती पोहोचवण्यात आयोजक अपयशी ठरल्याने, ती संकल्पना स्पष्ट न झाल्याने अवघ्या सात स्पर्धकांचे ३१ सेल्फी प्राप्त झाले. ही स्पर्धा नक्की काय आहे, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे जे काही सेल्फी मिळाले, त्यालाही विशेष असा दर्जा नाही, त्यात कलात्मकता फारशी नसल्याने सातपैकी पाच जणांची निवड करून त्यांनी बक्षीस कसे द्यायचे, असा सवाल परीक्षकांपुढे आहे. या स्वागतयात्रेत हजारोंच्या संख्येने ठाणेकर सहभागी झाले होते. त्यांच्याकडून निदान १०० सेल्फी तरी परीक्षकांना अपेक्षित होते. मात्र, ही संकल्पना पोहोचवण्यात न्यास कमी पडल्याने अनेकांनी सेल्फी काढूनही स्पर्धेत सहभाग घेतला नसल्याचे काही परीक्षकांचे निरीक्षण आहे. सेल्फी विथ स्वागतयात्रा म्हणजे नेमके काय? नक्की कसा फोटो काढायचा, त्यात नेमके काय दिसणे अपेक्षित आहे, यासारख्या बाबी ठाणेकरांपर्यंत न पोहोचल्याने काही तरुणांनी सहभाग घेणेच टाळल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे पहिल्या प्रयत्नातच ही संकल्पना डिलीट झाली. त्यामुळे पुढच्या वर्षी सेल्फी विथ स्वागतयात्रेसाठी एक स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्याचा फोटो सर्कल सोसायटीचा मानस आहे.