शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीचा मोबदला देण्यास होतोय विलंब, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:53 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत काम करणा-या मैल कामगारांना मे महिन्यात सेवानिवृत्त करण्यात आले. मात्र, त्यांना

ठाणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत काम करणा-या मैल कामगारांना मे महिन्यात सेवानिवृत्त करण्यात आले. मात्र, त्यांना अद्यापही सेवानिवृत्तीनंतरची रक्कम जिल्हा परिषदेकडून मिळाली नसल्याचा आरोप करून त्याविरोधात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद कामगार युनियनद्वारे देण्यात आला आहे.मुरबाड तालुक्यातील शांताराम गोळे, बारकू बसमा, घारू ठोमरा, दौलत भागरत, केशव देशमुख आदी पाच मैलकुली कामगार सुमारे सहा महिन्यांपासून सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर, त्यांना मिळणारी रक्कम अद्यापही जिल्हा परिषदेकडून मिळाली नसून निवृत्तीवेतनही त्यांना लागू केले नाही. यामुळे या कर्मचाºयांची उपासमार होत आहे. या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना सेवारकमेसह गटविमा योजना, थकबाकी रक्कम आदी व निवृत्तीवेतन मिळणे अपेक्षित होते. यामुळे या कर्मचाºयांसाठी जि.प. कामगार युनियन बेमुदत उपोषण छेडण्याच्या तयारीत आहे.‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ या पद्धतीचा उपक्रम जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर राबवला जात आहे. मात्र, त्यातही या कर्मचाºयांना अद्याप न्याय मिळालेला नाही. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम अधिकाºयांसह कर्मचारी जोरदारपणे राबवत आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमात या कर्मचाºयांच्या फायलींचा विचार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने करणे अपेक्षित आहे. अन्यथा, झीरो पेंडन्सी व दक्षता शपथ निष्फळ होण्याची दाट शक्यता आहे.