Defeat the fanatics: Kolse-Patil | धर्मांध शक्तींचा पराभव करा : कोळसे-पाटील
धर्मांध शक्तींचा पराभव करा : कोळसे-पाटील

ठाणे : मोदी, शहा आणि फडणवीस, चंद्रकांत पाटील, भाजप पक्ष यांविरुद्ध येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघांतून धर्मांध शक्तीचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकच उमेदवार द्यावा, असे आवाहन राज्यातील बहुजन नेत्यांना महाराष्ट्र बहुजन आघाडीचे संस्थापक माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
येथील शासकीय विश्रामगृहात कोळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील बहुजन नेत्यांना एकत्र येऊन एकच उमेदवार देण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत आघाडी होत नाही, असे दिसताच मी माझे मित्र प्रकाश आंबेडकर यांना देऊ केलेला पाठिंबा नम्रपणे त्यांची मैत्री कायम ठेवून नाकारलेला आहे. त्यामुळे तशी विभागणी होईल, असं काहीही, कुठल्याही परिस्थितीत काम मी करणार नाही. आता सध्या माझ्याकडे बाराबलुतेदार परिवर्तन नावाची संकल्पना घेऊन कमीतकमी शंभरपेक्षा अधिक संघटनांंच्या विनंतीवरून १७ जुलैला, जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षांचा राष्ट्रीय महासचिव, या नात्याने बैठक घेतल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.
सर्वांच्या मागण्या समजून घेतल्या व आघाडीची सत्ता आली, तर त्या मंजूर करून घेण्याचे आश्वासन संघटनांच्या नेत्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, ‘या सर्वजणांनी कुठल्याही सबबी न सांगता आघाडीलाच मत देण्याचेही कबूल केलेले आहे.‘महाराष्ट्र बहुजन आघाडी’ निवडणूक लढवण्याचीही अवास्तविक मागणी करणार नाही, हेही वचन त्यांच्याकडून घेतले आहे.


Web Title: Defeat the fanatics: Kolse-Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.