शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची बदनामी, अजय जया तुरुंगात; नौपाडा पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 02:58 IST

अजय जया यांना अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली.

ठाणे : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी धर्मराज्य पक्षाचे ठाणे शहर संघटक अजय जया यांना अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.

ठाण्यातील ‘प्रशांत कॉर्नर’ या मिठाईच्या दुकानावर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने  २५ मे रोजी कारवाई केली हाेती. या कारवाईचा संबंध एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्याशी जोडून शिंदे कुटुंबीयांची बदनामी करण्याचे षडयंत्र अजय जया यांनी रचल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात २८ मे २०२३ रोजी दाखल झाली होती. 

नौपाडा पोलिस ठाण्यात कलम १२० - ब नुसार कटकारस्थान रचणे, सोशल मीडियाद्वारे दुकानात वाद झाल्याची अफवा पसरविल्याने कलम ५०५ (२) नुसार तेढ निर्माण करणे आणि कलम ५०० नुसार बदनामी केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात पोलिस निरीक्षक आनंद निकम यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जया यांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना  न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्यांची  रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे