शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागांमध्ये होणारी घट प्रस्थापितांच्या पथ्यावर; बदलामुळे नव्याने होणार प्रभागरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:21 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका

- प्रशांत माने कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधील १८ गावे वगळल्याने प्रभागांची संख्या आता १२२ वरून ११८ झाली आहे. या बदलामुळे नव्याने प्रभागरचना होणार आहे. चार प्रभाग कमी झाल्याने त्यातील सर्वसाधारण गटातील दोन, अनुसूचित जातीची एक आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग गटातील एक अशा चार जागाही कमी होणार आहेत. आरक्षणाच्या रचनेत प्रस्थापितांची चांगलीच कोंडी होणार होती; पण बदलामुळे प्रभागांची झालेली घट त्यांच्या पथ्यावर पडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

२७ गावांपैकी १८ गावे वगळल्याची आणि नऊ गावे केडीएमसीत राहतील, याबाबतची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर महापालिकेत आता ११८ प्रभाग राहतील. यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. प्रभागरचनेचे काम सुरू करा, असे निर्देशही दिले आहेत. २०१५ च्या निवडणुकीत महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ इतकी होती. यात अनुसूचित जातीमधील लोकसंख्या एक लाख ५० हजार १७१ तर अनुसूचित जमातीची ४२ हजार ५८४ इतकी लोकसंख्या होती. एकूण १२२ प्रभाग होते. यात ५० टक्के महिलांसाठी राखीव जागा याप्रमाणे ६१ जागा होत्या.

सर्वसाधारण गटासाठी असलेल्या ७४ जागांपैकी ३६ जागा या महिलांसाठी होत्या. अनुसूचित जाती वर्गासाठी १२ जागा होत्या. यातील सहा जागा महिलांसाठी होत्या. अनुसूचित जमाती वर्गासाठी तीन जागा होत्या. यातील दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग गटासाठी ३३ जागा होत्या. यातील १७ जागा महिलांसाठी होत्या. आता नव्या रचनेत १८ गावे वगळल्याने महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येतही घट झाली आहे. बदलानुसार आता १३ लाख ३७ हजार ६८१ इतकी लोकसंख्या आहे.

अनुसूचित जातीमधील नागरिकांची संख्या एक लाख २८ हजार १०७ इतकी आहे, तर अनुसूचित जमातीमधील संख्या ३८ हजार ४१८ एवढी राहिली आहे. १२२ वरून प्रभागांची संख्या ११८ इतकी झाली आहे. ११८ पैकी ५९ जागा या महिलांसाठी राखीव असतील.

सर्वसाधारण गटातील दोन जागा कमी

सर्वसाधारण गटातील दोन जागा कमी झाल्या असून आता ७२ जागांपैकी ३५ जागांवर महिला सदस्य असतील. अनुसूचित जाती वर्गातील एक जागा कमी झाली आहे. यातील ११ जागांपैकी सहा जागांवर महिला असतील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातीलही एक जागा कमी झाली आहे. नव्याने होणाऱ्या रचनेत ३२ पैकी १६ जागा महिलांसाठी राहतील. अनुसूचित जमाती वर्गातील जागेत कोणताही बदल झालेला नाही. यातील तीन जागा ‘जैसे थे’ असून यातील दोन जागा त्या वर्गातील महिलांसाठी राखीव असतील.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका