शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:53 IST

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते.

पंकज पाटीलअंबरनाथ : कोरोनाची दुसरी लाट येणार, याची भीती सर्वांना असली तरी अंबरनाथमध्ये अद्याप रुग्णसंख्या पाहता दुसरी लाट आलेली नाही, हे उघड होत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, वाढीचे हे प्रमाण नियंत्रणात आहे. गणेशोत्सवाच्या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटत आहे.

गणेशोत्सव काळात बाजारपेठा उघडण्यात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली होती. सरासरी ५० ते ६० रुग्ण दिवसाला सापडत होते. कालांतराने हा आकडा अवघ्या २० ते ३० रुग्णांवर आला होता. ऑक्टाेबरमध्ये हाच आकडा १५ ते २० रुग्णांवर आला होता. मात्र, प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या घटलेली होती. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत घट झालेली आहे. १० ते १५ रुग्ण दिवसाला सापडत होते. रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने हा आकडा नियंत्रणात आला. दिवाळी झाल्यावर कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी भीती प्रशासनाला होती. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने यंत्रणाही तयार केली होती. अतिदक्षता विभागाची संख्याही वाढवली. मात्र, रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. गेल्या आठवड्याचा अहवाल पाहता दिवसाला १५ ते २५ रुग्ण सापडण्याचे प्रमाण आहे. तरीही, अंबरनाथ शहराने ३०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे. तर, बदलापूर पालिकेने २०० हून अधिक बेडची व्यवस्था केली आहे.  रुग्णसंख्या घटत असल्याने पालिकेला आपली आरोग्यव्यवस्था तत्पर ठेवण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे भविष्याच्या कोरोनालाटेच्या प्रतीक्षेत प्रशासन सतर्क दिसत आहे.

रुग्णसंख्या नियंत्रित आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही नियंत्रित आहे. सरकारच्या सतर्कतेच्या सूचनांमुळे आम्ही यंत्रणा तयार करून ठेवली आहे. याआधीही आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे काम केले आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस