शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

निर्णय मान्य, पण मंदिर भूमिपूजनाची घाई नको...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 03:35 IST

मुंब्रा येथील रहिवाशांच्या प्रतिक्रिया : कोरोना संकटाच्या काळात थांबायला हवे!

कुमार बडदेमुंब्रा : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे, याबद्दल आनंद आहे. मात्र देशात कोरोनाने थैमान घातले असून, ८० टक्के लोकांनी रोजगार गमावला असताना भूमिपूजनाची घाई योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिल्या.सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. अशावेळी राम मंदिराचे भूमिपूजन करणे चुकीचे आहे. भूमिपूजनाऐवजी सरकारने कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांना पुन्हा रोजगार कसा मिळेल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आजही देशातील ८० टक्के नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. ती सावरण्यासाठी त्यांना कशी आर्थिक मदत देता येईल, देशातील बंद असलेले उद्योगधंदे पुन्हा कसे सुरळीत सुरू होतील, यासाठी सर्वप्रथम पावले उचलणे आवश्यक होते. केवळ बिहार निवडणुकीवर डोळा ठेवून भूमिपूजनाची घाई केली जात आहे हे सर्व जाणतात, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राम मंदिराची उभारणी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. प्रभुराम यांनी जगाला त्याग आणि सेवा करण्याची शिकवण दिली. त्याचा अंगीकार नेत्यांनी करण्याची गरज आहे. रामाच्या नावाने सध्या जे राजकारण सुरू आहे ते मान्य नाही. ज्या ठिकाणी आता भूमिपूजन करण्यात येणार आहे तेथे १९८९ मध्ये मंदिराच्या नूतनीकरणासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. बुधवारी पुन्हा प्रदर्शन करून भूमिपूजनाची आवश्यकता नव्हती. कोरोनाचे थैमान सुरू असताना हा कार्यक्रम पुढे ढकलला असता तर बरे झाले असते.- इसाहक बिराजदार, लेखक, दूरदर्शनभूमिपूजन काही दिवसांनी झाले असते, तर काही बिघडले नसते. सध्या देश संकटात असताना इतकी घाई करण्याची गरज नव्हती.- फैसल चौधरी,सामाजिक कार्यकर्ताअयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी बुधवारी होत असलेल्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जादा कुमक मागविण्यात आलेली नाही.- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणेआम्ही देशाचे संविधान मानतो. संविधानामधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतिम आहे. यामुळे न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. काही जण राजकीय हेतूने मंदिर उभारणीला विरोध करीत आहेत. त्यांचा हा विरोध ९९.९९ टक्के मुस्लीम नागरिकांना मान्य नाही. परंतु कोरोनाचे संकट सुरू असताना भूमिपूजनाचा कार्यक्रम एवढ्या घाईने उरकण्याची गरज नव्हती. उत्तरेतील काही राज्यांमध्ये आगामी काही महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भूमिपूजनाची घाई करण्यात आली हे उघड आहे.- हसन मुल्लाणी, प्राध्यापकसर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. मंदिर उभारणीसाठी बुधवारी होत असलेले भूमिपूजन आणि आणि त्यानंतर मंदिराची उभारणीही सुरळीत व्हावी. पण पुन्हा १९९२ सारखी परिस्थिती उद्भवू नये. त्यावेळी दंगलीनंतर जीवाच्या भीतीने मुंबईतून मुंब्रा येथे आलो होतो. तेव्हा झालेले हाल भोगावे लागू नयेत. कुणावरही स्थलांतरित होण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा आहे.- अन्सार अहमद सिद्दिकी,भाजी विक्रेता

टॅग्स :thaneठाणेRam Mandirराम मंदिर