शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

कर्जबुडव्यांची मालमत्ता सरकारने विकत घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 05:12 IST

सुमारे २०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या सीकेपी को-आॅपरेटिव्ह बँकेची मालमत्ता शासनाने विकत घेऊन बँकेला नवसंजीवनी द्यावी, असे साकडे बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.

ठाणे : सुमारे २०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या सीकेपी को-आॅपरेटिव्ह बँकेची मालमत्ता शासनाने विकत घेऊन बँकेला नवसंजीवनी द्यावी, असे साकडे बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे.सीकेपी बँकेकडे ५२० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. यातून केलेल्या कर्जवाटपापैकी जवळपास २०५ कोटी रुपयांचे कर्ज वसूल झालेले नाही. या कर्जबुडव्यांची १४० कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुमारे ७० कोटींची मालमत्ता बँकेने गोठवली आहे. बँकेजवळ स्वत:ची २० कोटींची मालमत्ता आहे. रिझर्व्ह बँकेने सीकेपीचा परवाना रद्द करण्याची तलवार डोक्यावर टांगती ठेवली आहे. मे २०१४ पासून रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधांमुळे बँकेचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत.सीकेपीची मालमत्ता विकली जात नसल्याने बँकेची अडचण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी एमपीआयडी कायद्यात दुरुस्ती प्रस्तावित करून फरारी आरोपींच्या मालमत्ता शासनाने विकत घेण्याची तयारी दर्शविल्याने ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ठेवीदारांच्या संघटनेने पंतप्रधान, मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या राज्यपालांसह मान्यवरांना निवेदन देऊन बँकेला नवसंजीवनी देण्याचे साकडे घातले आहे.दरम्यान सीकेपीचे १ लाख ३५ हजार ठेवीदार असून, त्यापैकी ८० टक्के ठेवीदार ज्येष्ठ नागरिक आहेत. आयुष्यभराची पुंजी त्यांनी सीकेपीत ठेवीच्या स्वरूपात जमा केली होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस