शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वेदांतमधील ‘त्या’ चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी नाही; चौकशी समितीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 05:45 IST

प्रकृती चिंताजनक असल्यानेच मृत्यू : चौकशी समितीचा निष्कर्ष

ठाणे : येथील वर्तकनगरमधील वेदांत हॉस्पिटलमध्ये सोमवारी ऑक्सिजनअभावी चार जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपल्या अहवालात त्या चार रुग्णांचा मृत्यू वैद्यकीय हलगर्जीपणा अथवा ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले  आहे.

सोमवारच्या घटनेनंतर चौघांचा मृत्यू ऑक्सिजनअभावीच झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केल्याने रुग्णालय प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी करून या प्रकरणात सहा जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले होते.

या समितीने सोमवारी सायंकाळी उशिरा रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार येथे एकूण किती मृत्यू झाले, मृतांची नावे, वय, कोविड आजाराबाबत व रुग्णाच्या आरोग्य विषयक स्थितीची इतर आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. तसेच मृत्यू एकाच वेळेस झाले की वेगवेगळ्या वेळेत झाले याची माहितीही घेतली गेली, मृत्यूची कारणे, व मृत्यूची वेळ या रुग्णांच्या मृत्यूचा ऑक्सिजनपुरवठ्याशी काही संबंध आहे का, याचीदेखील सविस्तर माहिती घेण्यात आली.

विशेष म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनवर असलेल्या इतर रुग्णांशीदेखील या समितीमधील सदस्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार या चारही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. तसेच या रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असून, प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूची वेळ वेगवेगळी असल्याचेही पाहणीत समोर आले आहे. येथे उपचारार्थ अन्य रुग्ण असून, ऑक्सिजन नसता तर त्यांनादेखील त्याचा फटका बसला असता. परंतु, तसे काहीच निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच त्या चार रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस