शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

भिवंडीतील कुहे गावातील निवारा शेडच्या आगीत ११ बकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 8:42 PM

भिवंडी : तालुक्यातील कुहे गावातील भंडारपाडा या आदिवासी वसाहतीत बक-यांच्या शेडला आग लागल्याने ११बक-यांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन बक-या गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली आहे.या प्रकरणी उशीरा नोंद घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.कुहे गावातील भंडारपाडा येथे माधव पदू ठाकरे यांचे शेळी निवाराशेड असून  या शेडला लागलेल्या ...

ठळक मुद्दे बक-यांच्या शेडला आग लागल्याने ११बक-यांचा होरपळून मृत्यूआग विझविताना त्यांचा मुलगा सचिन ठाकरे (२२)हा देखील भाजला ही आग शॉर्टसर्किटने लागली कि मच्छरांसाठी लावण्यात आलेल्या धुरामुळे

भिवंडी : तालुक्यातील कुहे गावातील भंडारपाडा या आदिवासी वसाहतीत बक-यांच्या शेडला आग लागल्याने ११बक-यांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन बक-या गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली आहे.या प्रकरणी उशीरा नोंद घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.कुहे गावातील भंडारपाडा येथे माधव पदू ठाकरे यांचे शेळी निवाराशेड असून  या शेडला लागलेल्या आगीने शेळीपालन व्यावसायीक चिंताग्रस्त झाले आहेत. माधव ठाकरे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनचा व्यवसाय सुरु केला होता.त्यांच्याकडे एकूण ३० बक-या होत्या. या बक-यांसाठी त्यांनी घराच्या बाजूलाच निवाराशेड उभारली होती. तसेच लाकडी माच तयार केला होता. आज पहाटेच्या वेळी अचानक या निवारा शेडला आग लागली. या आगीत ११ बक-यांचा होरपळून मृत्यू झाला तर ३ बक-या जळून गंभीर जखमी झाल्या आहेत. ही आग शॉर्टसर्किटने लागली कि मच्छरांसाठी लावण्यात आलेल्या धुरामुळे लागली,हे आद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.या आगीची घटना समजताच माधव ठाकरे यांनी कुटूंबासह घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला.आग विझविताना त्यांचा मुलगा सचिन ठाकरे (२२)हा देखील भाजला आहे.या घटनेची माहिती मिळताच कुहे गावच्या सरपंच निराबाई भुरे ,पं. स. सदस्य रेखा उघडा ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनिल मुंढे ,पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी आर.आर.पाटील या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.यावेळी शेळी पालन शेतक-याला शासनाने आर्थिक मदत द्यावी, यासाठी पंचनामा करून तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना अहवाल सादर केला आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग