शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तरुणावर खूनी हल्ला: पूर्वाश्रमिच्या प्रेयसीसह दोघांना पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 18:07 IST

वारंवार सांगूनही पिच्छा पुरविणा-या पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर एका तरुणीने तिच्या सध्याच्या प्रियकराच्या मदतीने खूनी हल्ला केल्याचा प्रकार आझादनगर भागात घडला. या हल्लानंतर पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नास असतांनाच हल्लेखोर प्रियकराला पोलिसांनी पकडले.

ठळक मुद्देठाण्याच्या आझादनगर भागातील घटना तरुणाची प्रकृती चिंताजनकहल्ल्याबाबत भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

ठाणे : आपल्या मागे लागू नये, हे समजून सांगण्यासाठी आलेल्या एका तरुणीने तिच्या आधीच्या मित्रावर प्रियकरासह खूनी हल्ला केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी चिरंजीत उर्फ रोहित विश्वास (३०) याच्यासह त्याच्या कथित प्रेयसीला राबोडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.आझादनगर भागातील देवश्री गार्डन, प्लॅटिनम हॉस्पीटल येथून विलास मते हा २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.४५ ते २.१५ वाजण्याच्या सुमारास घरी जात होता. त्याचवेळी त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी तिच्या सध्याचा प्रियकर रोहितसह तिथे आले. आता यापुढे माझ्याशी संबंध ठेवू नकोस, असे सांगून तिने त्याला दमदाटी केली. त्यानंतर रोहितनेही तिला हिच्याबरोबर संबंध ठेवू नकोस, असे सांगत दमबाजी केली. एवढयावरच न थांबता दोघांनीही त्याला डोक्यात आणि पोटात त्याला जबर मारहाण केली. पोटात आणि डोक्यावर जबर मार लागल्याने तो यात गंभीर गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विलासचा भाऊ विकासने राबोडी पोलीस ठाण्यात रोहित आणि त्याच्या मैत्रिणीविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा ३ डिसेंबर रोजी दाखल केला. पोलीस निरीक्षक दिलीप रासम यांच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहितला आणि त्याच्या मैत्रिणीलाही सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अटक केली.

 

 

टॅग्स :thaneठाणेcommunityसमाज