शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यास ऑक्टोबरची डेडलाइन, केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 01:14 IST

जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडविया यांनी बुधवारी केंद्रीय आंतरदेशीय जलवाहतूक प्राधिकरण तसेच केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना दिले.

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली या शहरांना जोडणाऱ्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडविया यांनी बुधवारी केंद्रीय आंतरदेशीय जलवाहतूक प्राधिकरण तसेच केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना दिले. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी आवश्यक असणारा ८६ कोटींचा निधीही तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये असलेल्या खाडीचा व नदीमार्गाचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी उपयोग करण्याच्यादृष्टीने ठाणे महानगरपालिकेने वसई, कल्याण आणि ठाणे यांना जोडणारा क्र मांक ५३ चा जलमार्ग विकसित करण्याबाबतचा प्रकल्प अहवाल सादर केला होता. त्याला केंद्रीय जलवाहतूक मंत्रालय व आंतरदेशीय जलवाहतूक प्राधिकरणाने यापूर्वीच मंजुरी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्र्यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीला केंद्रीय जलवाहतूक सचिव गोपालकृष्ण, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय सेठी, आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीर पांड्या, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, जलवाहतूक मंत्रालयाचे सहसचिव रजत सच्चर आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ठाणे महापालिकेचे आयुक्त जयस्वाल यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत वसई-ठाणे-कल्याण या ५३ क्रमांकाच्या जलमार्गाचे सादरीकरण केले तसेच हा जलमार्ग विकसित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाºया कोंडीतून या परिसरातील नागरिकांची सुटका होणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पाचा फायदा या क्षेत्रातील महापालिकांना होणार असल्याने हा प्रकल्प सुरू होणे गरजेचे असल्याचे सांगितले.>पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी जेटीया जलमार्गासाठी एकूण ६४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात मीरा-भार्इंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या चार ठिकाणी जेटी बांधणे, रिव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम विकसित करणे तसेच तीन वर्षे बोटींची दुरुस्ती, निगा व देखभालीच्या खर्चाचा समावेश असून यासाठी अंदाजे ८६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या अनुषंगाने या बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. त्यानंतर, केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी आॅक्टोबरपर्यंत सुरू करण्यात यावी तसेच यासाठी आवश्यक असणारा निधी वितरित करणे त्याचप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर जलमार्ग वाहतूक मार्ग संचालन मुंबई मेरीटाइम बोर्ड आणि आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण यांनी संयुक्तपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.