कल्याण : सध्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा वापरून थकित बिले भरण्याचे आवाहन कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे केले जात असताना दुसरीकडे थकबाकीदारांविरोधातही पालिकेने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. पाणीपुरवठा विभागाने अ, ह आणि ड प्रभागांत कारवाई करून बुधवारी थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत केला. आयुक्त ई. रवींद्रन यांनी मालमत्ता तसेच पाणी थकबाकीदारांविरोधात कडक कारवाईच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मालमत्ता कर थकविणाऱ्यांंविरोधात कारवाई जोमाने सुरू असताना आता पाणी बिले थकविणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. पाणीपुरवठा विभागाने सर्वच प्रभागांमध्ये थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)
पाणीबिल थकविणाऱ्यांना दणका
By admin | Updated: November 17, 2016 07:08 IST