शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ढाब्यात नाग शिरल्याने उडाली ग्राहकांची घाबरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:55 IST

भिवंडी : मित्रमंडळीचे वाढदिवस असो की कुटूंबातील सदस्यांचा मुड असो हल्ली रस्त्यालगत झालेल्या मोकळ्या-ढाकळ्या ढाब्यावर रात्रीच्या वेळी खवय्यांची रिघ लागलेली दिसत आहे. गेल्या काही वर्षात ढाबा संस्कृतीने खवय्यांना आकर्षीत केल्याने रात्रीच्या मोकळ्या आभाळाखाली मोठमोठ्या जेवणावळी सुरू असतात.अशीच एक पार्टी रंगात आली असताना पार्टीतील सदस्याने ढाब्याच्या आवारात शिरलेला नाग पाहिल्यानंतर त्याची ...

ठळक मुद्देढाबा संस्कृतीने खवय्यांना आकर्षीत केल्याने घडतात जेवणावळीएका तरु णाने ढाब्यात नाग शिरत असताना पाहिलाढाबा मालकांसह ग्राहक देखील धास्तावले

भिवंडी : मित्रमंडळीचे वाढदिवस असो की कुटूंबातील सदस्यांचा मुड असो हल्ली रस्त्यालगत झालेल्या मोकळ्या-ढाकळ्या ढाब्यावर रात्रीच्या वेळी खवय्यांची रिघ लागलेली दिसत आहे. गेल्या काही वर्षात ढाबा संस्कृतीने खवय्यांना आकर्षीत केल्याने रात्रीच्या मोकळ्या आभाळाखाली मोठमोठ्या जेवणावळी सुरू असतात.अशीच एक पार्टी रंगात आली असताना पार्टीतील सदस्याने ढाब्याच्या आवारात शिरलेला नाग पाहिल्यानंतर त्याची घाबरगुंडी उडाली अन् तो सा..प साप.. साप..ओरडत जेवण तेथेच टाकून ढाब्याच्या बाहेर पळाला. त्याच्या पाठोपाठ ढाब्यातील इतर ग्राहकांनी देखील ढाब्याबाहेर धूम ठोकून आपला जीव वाचविल्याची घटना तालुक्यातील भिवंडी-कल्याण मार्गावरील बापगाव परिसरातील ढाब्यावर घडली. या घटनेचा मुंबई-नाशिक व भिवंडी -नाशिक मार्गावरील धाबा मालकांनी धसका घेतला आहे.ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमुख रस्त्यावर ढाबा संस्कृतीला पेव फुटले आहे. या ठिकाणी गावठी चिकन, मासे, मटणावर ताव मारण्यासाठी अनेक खवय्ये रात्रीच्या सुमाराला जास्त प्रमाणात गर्दी करतात. त्याप्रमाणे भिवंडी तालुक्यातील भिवंडी-कल्याण मार्गावर बापगाव परिसरातील जगदंबा ढाब्यावर रात्री १२ च्या सुमारास काही तरु णमंडळी जेवणाचा बेत आखून ढाब्यावर गेले. तेथे गप्पांचे फड रंगून जेवण करताना एका तरु णास ढाब्यात नाग शिरत असताना पाहिला.त्याने जोरात सापाच्या नावाने बोंबा मारून जेवणाच्या ताटावरून पळ काढला. हे पाहून इतरही ग्राहकांनी ढाब्याबाहेर धूम ठोकली.त्यानंतर ढाबा मालकाने सर्पमित्रांना फोन करून ढाब्यात बोलाविले व नाग शिरल्याची माहिती दिली. काही वेळातच कल्याणचे सर्पमित्र दत्ता बोंबे याने ढाब्यावर येऊन ढाब्यात लपलेल्या नागाला काही मिनिटांतच पकडले.त्याने ४ फुट असलेल्या नागाला कापडाच्या पिशवीत टाकून दुसºया दिवशी वन विभागाची परवानगी घेऊन जंगलात सोडणार असल्याचे ढाबा मालकास व लोकांना सांगीतले.मात्र या घटनेने ढाबा मालकांसह मोकळ्या आभाळाचा आनंद घेणारे ग्राहक देखील धास्तावले आहेत.

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडीhotelहॉटेल