कल्याण - तिसगांव नाक्यावरील हॉटेल मनाली समोर असलेला चेंबर वारंवार ढासळत असून या चेंबरची २० मे अखेरपर्यंत तब्बल ४ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.गेल्या २० मे रोजी हा चेंबर दुरूस्त करतांनाही रेती ऐवजी भुशाचा वापर केला जात असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु त्यावेळीही या निष्कृष्ट दर्जाची कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा लोकप्रतिनिधीने दखल न घेतल्याने निष्कृष्ट साहित्य वापरून सदरचा चेंबर दुरूस्त करण्यात आला होता. परिणाम स्वरूप हाच चेंबर परवा परत खचल्याने निर्माण झालेल्या खड्डयात काल एक थ्री व्हीलर टेम्पो अडकून पडला होता. या टेम्पोचे मोठे नुकसान झाले. परंतु, सुदैवाने जिवीतहानी होता होता वाचली. आता हाच चेंबर परत तशाच पध्दतीने दुरुस्त केला तर भविष्यात या चेंबरमुळे मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Video : पुना लिंक रोडवरील धोकादायक चेंबर पुन्हा ढासळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:56 IST
२० मे अखेरपर्यंत तब्बल ४ वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.
Video : पुना लिंक रोडवरील धोकादायक चेंबर पुन्हा ढासळला
ठळक मुद्देनिष्कृष्ट साहित्य वापरून सदरचा चेंबर दुरूस्त करण्यात आला होता. भविष्यात या चेंबरमुळे मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.