शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील धोकादायक इमारत कोसळली, सुदैवाने जिवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:49 IST

भिवंडी: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील दोन मजली इमारत काल रात्री दरम्यान कोसळली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या घटनेने ग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यालगत कारीवली ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या संख्येने अनाधिकृत बांधकाम झाले असून अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाच्या बनलेली आहेत. भिवंडी-वसई ...

ठळक मुद्देकारीवली ग्रामपंचायत हद्दीतील व्यावसायीक इमारत कोसळलीग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरकामगार इमारतीबाहेर पडल्याने प्राणहानी नाही

भिवंडी: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत हद्दीतील दोन मजली इमारत काल रात्री दरम्यान कोसळली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या घटनेने ग्रामिण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यालगत कारीवली ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या संख्येने अनाधिकृत बांधकाम झाले असून अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाच्या बनलेली आहेत. भिवंडी-वसई रोडवरील बहात्तर गाळ्याजवळ जे.व्ही.सी. कंपाऊण्ड येथील प्रियांका कॉम्प्लेक्स या निकृष्ट बांधकाम असलेल्या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील कामगारांना काल मंगळवार रोजी सकाळपासून भिंतीवरील प्लास्टर सुटून माती पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आपल्या कारखाना मालकांना सांगून ते इमारतीतील गोदाम व कारखान्याच्या इमारतीबाहेर पडले. ही इमारत रेवाभाई मेहता या विकासकाने बनवून त्यामधील व्यावसायीक व गोदामांची विक्री केली,अशी माहिती सिध्देश शहा या कारखानदाराने दिली. इमारत कमकुवत झाल्याची तक्रार गाळेधारक व व्यावसाईक यांनी विकासकडे करूनही त्यांनी दखल घेतली नाही. गेली चार दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने काल मंगळवारी दिवसभर पाणी व माती इमारतीमध्ये पडू लागले होती. त्यामुळे सदर इमारत धोकादायक झाल्याने इमारतीतील व्यावसायीकांनी काल रात्री भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीसांनी सुरू असलेल्या पावसात कमकुवत झालेल्या इमारतीची पहाणी केली असता त्यांच्या समोर इमारतीचा काही भाग ढासळला. या घटनेची माहिती पोलीसांनी पालिकेच्या आपत्कालीन विभाग व आग्निशामक दलास माहिती दिली. दरम्यान इमारतीचा बरासचा भाग सुरू असलेल्या पावसामुळे काल रात्रीदरम्यान कोसळला असून कोणतीही प्राणहानी झाली नाही. सदर इमारतीच्या कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसून इमारतीचा उरलेले धोकादायक बांधकाम आपत्ती व्यवस्थापनाकडून तोडला जाणार आहे,अशी माहिती कारखानदारांनी दिली.

टॅग्स :BhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना