शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू स्टेशनला वारली साज

By admin | Updated: February 8, 2017 04:01 IST

डहाणू रोड रेल्वे स्थानकास सुशोभीकरण व रंगरंगोटीच्या माध्यमातून वारली चित्रकलेचा साज चढविण्यात आला आहे.

अनिरुद्ध पाटील, डहाणूडहाणू रोड रेल्वे स्थानकास सुशोभीकरण व रंगरंगोटीच्या माध्यमातून वारली चित्रकलेचा साज चढविण्यात आला आहे. या मेकओव्हरने स्थानकाचे रुपडे पालटण्यासह विविध पायाभूत सुविधा उपलब्ध केल्याने प्रवाशी तसेच डहाणूकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. डहाणू रोड हे सुरक्षित स्थानक म्हणून नावारूपाला येत आहे. येथील लोकलच्या फेऱ्या वाढवून, सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी स्थानकाला भेट दिली. त्या अनुषंगाने हा कायापालट झाला आहे. हे करतांना स्थानिक संस्कृतीची ओळख परगावातील प्रवाशांना व्हावी या दृष्टीने जातीने लक्ष दिले आहे. या करिता स्थानकाच्या आत व बाहेर येथील लोक संस्कृती, रूढी-परंपरा, भौगोलिक माहिती गोष्टीरूपाने वारली चित्रकलेच्या माध्यमातून चितारण्यात आली आहे. स्थानिक वारली चित्रकारांनी हे उत्तम कार्य करून अंगिभूत कलेचे सादरीकरण केले आहे. २०११ सालचा पद्म पुरस्कार विजेता डहाणू तालुक्यातील जिव्या म्हसे यांचे चिरंजीव सदाशिव यांच्या नेतृत्वाखाली पंधरा कलाकारांनी हा साज चढवला आहे. सदाशिव यांनी ब्राझील, सिंगापूर, इटली, पॅरिस, जर्मनी, लंडन आदि देशांमध्ये जाऊन वारली चित्रकलेचा ठेवा सातासमुद्रापलीकडील मातीत रुजवण्याचे कार्य हाती घेतले आहे. शिवाय देशातील सर्व राज्यात जाऊन ते तळागाळापर्यंत पोहचिवण्याचे मोलाचे काम सुरु केले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कला पोहचिवण्यायासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली असून हिंदीसह इंग्रजी, जपानी भाषा अवगत केली आहे. तर अन्य भाषा आत्मसात करण्यासाठी अविरत प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सांताक्रुझ रेल्वे स्थानकानंतर डहाणू रोड येथे वारली चित्रकलेचा हा आविष्कार पाहता येऊ शकतो.