शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये १३ ऐवजी १७ डिसेंबरला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:24 IST

पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या ठिकाणी १३ डिसेंबरऐवजी १७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.नगर परिषद निवडणुकांमधील उमेदवारी अर्जाबाबत न्यायालयाचा निकाल आणि त्या अनुषंगाने संबंधित अधिनियमातील तरतुदी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. नवीन वेळापत्रकानुसार डहाणू, जव्हार आणि तळोदा येथे १७ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. तर, मतमोजणी दुसºया दिवशी १८ डिसेंबरला होईल. यासोबतच खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.६-अ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील १३ डिसेंबर ऐवजी १७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले.इगतपुरी, त्र्यंबक (नाशिक) आणि जत (सांगली) येथील नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मात्र आधी घोषित केल्याप्रमाने दहा डिसेंबरला मतदान होईल. हुपरी (कोल्हापूर), नंदुरबार, नवापूर (नंदुरबार), किनवट (नांदेड), चिखलदरा (अमरावती), पांढरकवडा (यवतमाळ), वाडा (पालघर), शिंदखेडा (धुळे), फुलंब्री (औरंगाबाद) आणि सालेकसा (गोंदिया) या नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी १३ डिसेंबर रोजीच मतदान होईल, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले.इगतपुरी, त्र्यंबक आणि जत येथे उद्या मतदानइगतपुरी त्र्यंबक आणि जत नगरपरिषदेसाठी सदस्यपदांसोबतच थेट अध्यक्षपदासाठीदेखील रविवारी मतदान होईल. त्याचबरोबर सटाणा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५-अ च्या रिक्तपदासाठीदेखील रविवारीच मतदान होणार आहे. इगतपुरी नगरपरिषदेच्या एकूण ९ प्रभागातील १८ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण २४ हजार ४६८ मतदार असून त्यांच्यासाठी ३४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.त्र्यंबक नगरपरिषदेच्या एकूण ८ प्रभागातील १७ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण १० हजार ६१४ मतदार असून त्यांच्यासाठी १७ मतदान केंद्रांची व्यवस्था आहे.जत नगरपरिषदेच्या एकूण १० प्रभागातील २० जागांसाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण २४ हजार ५६० मतदार असून ३६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक