शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 20:39 IST

Cyclone Nisarga: वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.

मीरा रोडः निसर्ग या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक या समुद्र किना-यावरील गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु वादळाच्या शक्यतेने बोटी व त्यातील साहित्य सुखरुप ठेवण्यासाठी मच्छीमारांची मोठी तारांबळ उडाली. सुकवत ठेवलेली मासळी भिजून नुकसान  झाले. प्रशासनाने खबरदारी म्हणून काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेने समुद्र किनारी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले होते. या शिवाय अग्निशमन दल, पोलीस व तटरक्षक दलसुद्धा सज्ज होते. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख, मंडळ अधिकारी दिपक अनारे, तलाठी तर उपअधीक्षक शशिकांत भोसले, सहय्यक निरीक्षक सतीश निकमसह पोलीस व एनडीआरएफच्या जवानांनी कोळीवाड्यांमध्ये फिरून परिस्थतीचा आढावा घेतला. आयुक्त चंद्रकांत डांगे देखील पालिका अधिकारायांसह दुपारनंतर उत्तनला पोहोचले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून सातत्याने आढावा घेतला जात होता तसेच आवश्यक सूचना ते करत होते.  महसूल, पोलीस व पालिका प्रशासाने मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेवक शर्मिला गंडोली, हेलन गोविंद, एलायस बांडय़ा तसेच चर्चच्या धर्मगुरुंसोबत फिरून किना-यावर राहणा-या मच्छीमारांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. संत जोसेफ शाळा व वेलंकनी चर्च येथे लोकांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी मच्छीमारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी भुतोडी बंदर भागातील समुद्रालगतची काही घरं रिकामी करायला घेतली होती. त्यांना नजीकच्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पालिकेने 5 बस लोकांना नेण्यासाठी तैनात केल्या होत्या. शिवाय रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते.

अनेक मच्छीमारांच्या बोटी समुद्रातच होत्या. वारा - पाऊस त्यातच वादळाचा धोका या मुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किना-यावर घेण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. क्रेनच्या सहाय्याने तसेच गरज असेल तिकडे मच्छीमारांनी दोरखंडाने बोटी ओढून किना-यास आणल्या. बोटींमधील जाळी व अन्य सामान काढण्यासह बोटींची बाहेरुन सफाई करण्याचे काम लगबगीने केले जात होते. त्सुनामी वेळी देखील उत्तन समुद्र किना-यास फटका बसलेला नसल्याने चक्रीवादळाबाबत देखील अनेक मच्छीमार फारसे गंभीर दिसत  नव्हते. परंतु अनेक घरांमध्ये चक्रीवादळाचे संकट टळू दे अशी प्रार्थना केली गेली. वादळी वा-यामुळे पत्रे उडून कोणी जखमी वा जीवितहानी होऊ याची भीती होती. सुदैवाने तशी घटना घडली नाही.

दरम्यान, वादळी वारा व पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या 10 घडना घडल्या. सृष्टी, पेणकरपाडा, उत्तन, काशीगाव, आंबेडकर नगर, नवघरचे रवीकिरण आदी भागात झाडं पडली. नवघरच्या साईचरण इमारत भागात झाड पडल्याने एका वाहनाचे नुकसान झाले. तर भाईंदर पोलीस ठाण्या समोर रस्त्यावर उभारलेली तपासणी शेड खालुन जाणाराया वाहनांवर पडली. परंतु यात नुकसान असे झाले नाही असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे म्हणाले.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ