शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन अर्जात सायबर कॅफेची दुकानदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:53 IST

पोलीस हैराण : राजकीय नेत्यांचे वशिले, चिरीमिरी कामी येत असल्याची चर्चा

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : गावी जाण्यासाठी नागरिकांना ई-पास घेणे गरजेचे असून नियमानुसार आॅनलाइन अर्ज भरूनही ई-पास मिळत नसल्याने नागरिकांत असंतोष आहे. दुसरीकडे, ई-पास मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे व खोटीनाटी कारणे अर्जात दाखविली जात असल्याने पोलीस हैराण झाले आहेत.ई-पास देणारी साखळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर, जिल्हा व राज्यबंदी घालण्यात आली आहे. मात्र अशा वेळी गावी जाण्यासाठी अनेक नागरिक इच्छुक आहेत. विनाकारण गावी जाणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने ई-पास सुरू केले. ई-पास मिळविण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या वेबसाइटवर आॅनलाइन अर्ज करावे लागतात.

ई-पास मिळविण्यासाठी केलेले अर्ज पोलीस फेटाळतात. मात्र राजकीय नेत्यांची शिफारस असल्यास त्वरित ई-पास दिला जातो, असा नागरिकांचा अनुभव आहे. नागरिक ज्या सायबर कॅफेमधून अर्ज करतात, तो सायबर कॅफे चालक ई-पास कसे मिळतात, याचे विविध मार्ग दाखवतो. चिरीमिरी दिल्यावर ई-पास मिळतो, अशीही चर्चा रंगली आहे. मात्र बहुतांश अर्जात खोटी माहिती, बनावट कागदपत्रे दिलेली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आपली पोलीस दरबारी ओळख असल्याचे सांगून ई-पास काढून देतो, असा धंदा जोरात सुरू आहे. पोलिसांनी छडा लावून ई-पास देण्यात पारदर्शकता आणण्याची मागणी होत आहे.ई-पाससाठी कराव्या लागणाºया अर्जासोबत प्रतिबंधित क्षेत्रात राहत नाही, असे महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांचे पत्र, आधारकार्ड, ज्या वाहनाने प्रवास करणार आहात त्याचा नंबर, गावी जाण्याचे कारण आदी कागदपत्रे जोडावी लागतात. नागरिक बहुतांश अर्ज सायबर कॅफेतून भरतात. मात्र बहुतांश अर्जावर कारण पटत नाही, असा शेरा मारून परवानगी नाकारली जाते.

टॅग्स :Policeपोलिस