शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सायबर पोलिसांनी ५ जणांना मिळवून दिली ऑनलाईन फसवणुकीची रक्कम 

By धीरज परब | Updated: July 12, 2024 11:31 IST

सायबर शाखेने फसवणुकीची सर्व १ लाख २५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली 

लोकमत  न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने सायबर लुटारुंच्या फसवणुकीचे बळी ठरलेल्या ५ जणांना त्यांच्या फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिली आहे . 

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर , सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल वाव्हळ , उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर सह मिलाग्रीस फर्नांडिस , सावन शेवाळे , सुवर्णा माळी , राहुल बन, विलास खाटीक , शुभम कांबळे, माधुरी धिंडे , पल्लवी निकम,    प्रवीण सावंत, राजेश भरकडे यांच्या पथकाने सदर गुन्ह्यांचा तपास करत पैसे परत मिळवून दिले . 

कालसी यांना मोबाईल  वर अनोळखी व्यक्ती कडून लिंक आली  होती . ती लिंक त्यांनी क्लिक केली असता त्यांच्या क्रेडिट  कार्ड च्या खात्यातून ३ लाख २५ हजार रुपये गेले . त्या पैकी १ लाख ७१ हजार ९७० रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले . दत्तानी  व्यक्तीचे अमेरिकन एअरलाईन्सच्या ट्रॅव्हलचे लॉगिन आयडी घेऊन त्याद्वारे त्यांची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती  . सायबर शाखेने फसवणुकीची सर्व १ लाख २५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली 

त्रिवेदी नावाच्या महिलेस अनोळखी कॉल करून तुमच्या खात्यात चुकून पैसे गेल्याचे सांगून व ती रक्कम परत करा असे सांगितले . त्यात त्रिवेदी यांची २२ हजार ४९३ रुपये ची फसवणूक केली होती. ती सर्व रक्कम पोलिसांनी पुन्हा मिळवून दिली. मेहता - झा नावाच्या महिलेने टेलिग्राम चॅनल वर ऑनलाईन पार्ट टाइम जॉब ची जाहिरात पहिली.  त्यात हॉटेल ना ऑनलाईन रेटिंग देण्यासाठीचे काम होते . त्यासाठी टास्क विकत घ्यावे लागतील सांगितले आणि त्यांची काही लाख रुपयांना फसवणूक केली गेली. सायबर पोलिसांनी त्या पैकी ७ लाख ५० हजार परत मिळवून दिले . 

तन्वर नावाच्या व्यक्तीला मोबाईल वर मॅसेज करून क्रेडिट कार्ड अपडेट करण्यासाठी लिंक पाठवण्यात आली . तन्वर यांनी लिंक क्लिक करून माहिती भरल्या नंतर त्यांच्या क्रेडिट कार्ड मधून ४७ हजार रुपये काढले गेले . ती सर्व रक्कम पोलिसांनी परत मिळवून दिली . 

टॅग्स :thaneठाणे