शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिकदृष्ट्या हे तर महा-राष्ट्र, दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:17 IST

महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले.‘आगरी युथ फोरम’च्या वतीने डोंबिवली क्रीडासंकुलात आयोजित पंधराव्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत व दाक्षिणात्य अभिनेत्री शीला माधवन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अभिनेता मधू सर यांच्यासह आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी आदी मान्यवर उपस्थित होते.अदूर गोपालकृष्णन म्हणाले की, केरळ आणि महाराष्ट्र यांच्या संस्कृतीचे दर्शन या आगरी महोत्सवातून होत आहे. अशा प्रकारचे उत्सव सातत्याने आयोजित केले जावे. त्यातून मराठी व मल्याळी यांचा स्नेह वाढीस लागेल. आंतरभारतीय संस्कृतीची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होईल. महाराष्ट्रात केरळी मोठ्या प्रमाणात राहतात. महाराष्ट्र व मुंबईच्या जडणघडणीत त्यांचाही सहभाग आहे, याकडे गोपालकृष्णन यांनी लक्ष वेधले.अभिनेत्री शीला माधवन म्हणाल्या की, आगरी महोत्सवाने महाराष्ट्रीयन व केरळी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा विचार प्रत्यक्षात आणला. महाराष्ट्राचे मन खूप मोठे आहे. त्याचा आम्हाला हेवा वाटतो.या वेळी आगरी युथ फोरमच्या वतीने वझे यांच्या हस्ते दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन व अभिनेत्री शीला माधवन यांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी म्हणाले की, आगरी महोत्सवाचा लौकिक सातासमुद्रापार नेण्याचे काम वझे यांनी केले आहे. त्यामागे त्यांची मेहनत आहे. दोन भिन्न संस्कृतींचे दर्शन व एकोपा याचा सात दिवस उत्सव सुरू राहणार आहे. त्याचा आनंद नागरिकांनी घ्यावा.प्रारंभी फोरमचे अध्यक्ष वझे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आगरी व केरळी संस्कृतीचे दर्शन घडवण्यावर आमच्या समाजातील काही मंडळीनी टीका केली असली तरी त्याला आम्ही चोख उत्तर दिले आहे. आगरी संस्कृती व अन्य संस्कृती यांचा मेळ घालण्याच्या प्रयत्नात काही मंडळी बाधा आणत असली, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हे पाऊल उचलले आहे.प्रचारामुळेतावडे, चव्हाण अनुपस्थितमहोत्सवाच्या उद्घाटनास शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने तावडे हे प्रचार सभांमध्ये असल्याने हजर राहिले नाही.त्याचबरोबर खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील निवडणुकांत तळ ठोकला असल्याने तेही अनुपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे