शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मटकाकिंग बाबू नाडरवर हल्ला करणारे अभिलेखावरील गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 03:19 IST

ठाणे : मटकाकिंग बाबू नाडरवर खुनी हल्ला करणारा हरेष तेलुरे (२८) याच्यासह त्याचाच सतरावर्षीय अल्पवयीन भाऊ हे दोघेही गुन्हेगारी ...

ठाणे : मटकाकिंग बाबू नाडरवर खुनी हल्ला करणारा हरेष तेलुरे (२८) याच्यासह त्याचाच सतरावर्षीय अल्पवयीन भाऊ हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. हरेषवर चार तर त्याच्या भावावर सहा गुन्ह्यांची नोंद आहे. या घटनेच्या सहा दिवस आधीच अल्पवयीन भाऊ बालसुधारगृहातून सुटला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली.नाडरवर सतरावर्षीय या हल्लेखोराने पूर्ववैमनस्यातून चाकूचे सात ते आठ वार केले. बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्या-प्रकरणी त्याला तीन महिन्यांपूर्वीच कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची भिवंडी बालन्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली होती. याच गुन्ह्यात त्याची एक आठवड्यापूर्वीच सुटका झाल्याने तो बाहेर आला होता. नाडरच्या माणसांशी त्याचा वाद झाल्याने त्याने आपल्या दोन्ही भावांच्या मदतीने त्याच्यावर २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास खुनी हल्ला केला. त्यावेळी हा हल्ला सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या विनोद मोहिते (४०) याच्यावरही त्याने हल्ला केला होता. दरम्यान, नाडर याच्या पोट आणि पाठीवर दोन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया एका खासगी रुग्णालयात पार पडल्या असून त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्याप्रकरणी हरेष तेलुरे याच्यासह त्याच्या १७ आणि १६ वर्षीय दोन अल्पवयीन भावांनाही पोलिसांनी कसारा रेल्वेस्थानक येथून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हरेषला सोमवारी राज्य राखीव दलासह मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ठाणे न्यायालयात हजर केले असता त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.नाडरलाही झाली होती अटककोपरीत मटका चालविणाºया बाबूला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडे जुगार हरणाºया दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. याच प्रकरणात तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या आदेशाने त्याला अटकही झाली होती. त्याच्या अड्ड्यावर अनेकवेळा धाड टाकूनही तो मात्र पोलिसांना हुलकावण्या देत होता.हल्लेखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमीहल्लेखोरांपैकी हरेष याच्यावर हाणामारीचे चार गुन्हे नोंद आहेत. तर, त्याच्या सतरावर्षीय भावावरही खुनाच्या प्रयत्नासह सहा गुन्हे कोपरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याने सात महिन्यांपूर्वीही एकाच्या भांडणात मध्यस्थी करणाºया हरुण रेलवानी यांच्यावर खुनी हल्ला केला होता. हरुण याने त्याला चोरीच्या गुन्ह्यातही पकडून दिले होते. याच रागातून हरुण याच्याही पोटावर त्याने वार केले होते. व्यसनी आणि कोणताही कामधंदा न करणारा हा हल्लेखोर नशेच्या आहारी गेल्यानंतर असे गैरप्रकार करीत असल्यामुळे पोलिसांपुढे त्याची डोकेदुखी झाल्याचे बोलले जाते.