शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले काकडीचे उत्पादन; ३०० किलो विक्रीसाठी जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:12 IST

बाळू लोखंडे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे

भातसानगर : शहापूर तालुक्यातील परटोली गावांमध्‍ये एका शेतकऱ्याने एक एकर जागेमध्ये काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या काकडी उत्पादनातून भरून येईल अशी त्यांना आशा आहे.

परटोली गावातील शेतकरी बाळू वेखंडे व रामचंद्र ढमके यांनी काकडीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली असून, जवळजवळ दिवसाआड त्यांची ३०० किलो काकडी ही बाजारात विक्रीसाठी जात आहे. मागील महिन्यात शेतकरी हताश झाला होता. उन्हाळ्यामध्ये काकडी, भेंडी यासारखे उत्पादन सध्या तालुक्यामधील शेतकरी घेत आहेत.

बाळू लोखंडे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता त्यांचा कल हा पावसाळी शेतीच्या ऐवजी उन्हाळी आणि हिवाळी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेण्याकडे वळला आहे. आपण अशा प्रकारची शेती करत आहोत याचा तरुणांनी बोध घ्यावा अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला आहे. आज काकडी १६ रुपये किलो जात असून उद्या तिचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या काकडीमधून आपल्याला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

६०-७० तोड्यातून हजारोंचा नफा होण्याची शक्यतासध्या काकडीला भाव १६ रुपये किलो इतका असल्याने त्यांनी यासाठी आतापर्यंत २५ हजार इतका खर्च केला असून जवळजवळ ६० ते ७० तोडे या काकडीचे होतील असे या शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे जवळजवळ दररोज पाच हजार रुपयांची काकडी बाजारात जात असून त्यांना यासाठी कमीत कमी ७० ते ८० हजार रुपये नफा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी