शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

टंचाईवरून रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:58 IST

महापापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पाणीटंचाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

उल्हासनगर : महापापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत पाणीटंचाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात दिवसाआड तर काही ठिकाणी आठवडयातून २ ते ३ दिवस पाणी पुरवठा होतो. मग १६० एमएलडी पाणी जाते कुठे? असा प्रश्न नगरसेवकांनी केला. अखेर महापौर मीना आयलानी यांनी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी समस्या सोडवण्याचे आदेश कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना दिले.शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने एका हंडयासाठी महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली, असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. शहराला एमआयडीसीकडून एकूण किती एमएलडी पाणीपुरवठा होतो. याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होत असेल तर, पाणी जाते कुठे? असा प्रश्नही आयुक्तांना विचारला.शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, अरूण अशांत, सुनील सुर्वे, धनंजय बोडारे, भाजपाचे प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, डॉ. प्रकाश नाथानी, जमनुदास पुरस्वानी, विजय पाटील, साई पक्षाचे टोणी सिरवानी, काँगे्रस पक्षाच्या अंजली साळवे, राष्ट्रवादीच्या सतरामदास जेसवानी आदींनी पाणीप्रश्नी कार्यकारी अभियंता सेलवण व युवराज भदाणे यांना धारेवर धरले.माणशी १३५ लिटर तर शहराच्या लोकसंख्येला ११० एमएलडी पाणी पुरसे आहे, असे सेलवण यांनी सांगितले. मात्र जुनी-नवी जलवाहिनी, पाणी गळतीमुळे शहराला दरदिवशी १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा होतो.४० ते ५० एमएलडी जादा पुरवठा होऊनही टंचाई निर्माण झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर जेसवानी यांनी शहराला पाणीपुरवठाकरणाºया मुख्य जलवाहिनीला मीटर नसल्याने शहराला किती एमएलडी पाणी पुरवठा होतो याबाबत अनिश्चिता आहे.महापालिका पाण्याचे जादा बिल देत असल्याचा आरोपही जेसवानी केला.महासभेत पाणीटंचाईवरून एकच गोंधळ झाल्याने, ज्या नगरसेवकांच्या प्रभागात पाणी नाही त्यांना उभे राहण्यास सांगितले. सर्वच नगरसेवक उभे राहिल्याने, महापौरही अवाक झाल्या. अखेर प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी समस्या सोडविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.