शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या खरेदीसाठी मुंब्य्रात झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 09:48 IST

कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सकाळी ११ नंतर विविध ठिकाणच्या शहरांमध्ये व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करावे लागत आहेत.

कुमार बडदे -  मुंब्राः शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदच्या खरेदीसाठी मुंब्य्रातील बाजारपेठांमध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची झुंबड उडाली होती. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेल्या स्थानिक नागरिकांमुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. तसेच मुख्य रस्त्यावर ठराविक काळाने वाहतूककोंडीदेखील होत होती.कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सकाळी ११ नंतर विविध ठिकाणच्या शहरांमध्ये व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय बंद करावे लागत आहेत. ते व्यापारीही मुंब्य्रात व्यवसायासाठी आले होते. रेडीमेड कपडे, नमाजसाठी लागणाऱ्या टोप्या, चादरी, खिडक्यांचे पडदे, चपला, महिलांची प्रसाधने, मेंहदी, इमिटेशन ज्वेलरी, ईदसाठी बनविण्यात येणाऱ्या व्यंजनासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या शेवया, मावा, काजू, बदाम आदी प्रकारचा सुकामेवा तसेच दूध प्राधान्याने खरेदी करण्यात येत होते. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ज्या व्यवसायावर निर्बंध घालण्यात आली आहेत ते केश कर्तनालय, कपडे, हार्डवेअर, चप्पल विक्री आदी सर्व प्रकारची येथील दुकानेदेखील ईदच्या पार्श्वभूमीवर बिनधास्तपणे सुरू होती. इतर शहरांमधील बहुतांश नागरिक, व्यापारी लॉकडाऊनचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करीत असतानाच मुंब्य्रात खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो बघून सर्वसामान्य नागरिक मात्र आश्चर्य व्यक्त करून पोलीस आणि महापालिकेविरोधात संताप व्यक्त करीत होते. 

‘ठामपाकडून कोणतीही परवानगी नाही’ईदसाठी तीन दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आल्याची चर्चा स्थानिक व्यावसयिकांमध्ये दिवसभर सुरू होती. मात्र, अशी कोणतीही परवानगी ठाणे महापालिका प्रशासनाने दिलेली नसल्याची माहिती सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली.  

टॅग्स :Eid e miladईद ए मिलादcorona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार