शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संकट डोंगराएवढे; मदत मात्र तुटपुंजी, पालघरच्या भूकंपवासीयांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 03:25 IST

गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघर जिल्हा पुरताच हादरून गेला आहे.

- नारायण जाधव ठाणे : गेल्या तीन महिन्यांपासून सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पालघर जिल्हा पुरताच हादरून गेला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात तेथे एक हजाराहून अधिक धक्के जाणवल्याची नोंद नॅशनल जिआॅग्राफिकल इन्स्टिट्यूट या संस्थेनेकडे आहे. शाळांसह घरांना तडे गेले असून, रहिवासी भयभीत झाले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने केवळ १५ लाखांचा मदत निधी वितरित करण्यास गुरुवारी मान्यता दिल्याने, हे भूकंपग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना पालघर जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.ही मदत ग्रामस्थांना तंबू बांधण्यासाठी, ताडपत्री उपलब्ध होण्यासाठी असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता, गेल्या तीन महिन्यांपासून पालघर, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके भूकंपाच्या धक्क्यांनी पुरते भयभीत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भूकंपाचा धक्का बसल्यानंतर झालेल्या धावपळीत एका बालकाचा मृत्यू झाला होता. अनेक भागांतील रहिवासी आजही घरात राहायला तयार नाहीत. शाळांमध्ये जायला विद्यार्थी धजावत नाहीत. त्यामुळे केवळ १५ लाखांचा निधी वितरित करून शासनाने थट्टा मांडली आहे काय? असा सवाल येथील लोकप्रतिनिधींनी केला आहे.>नुकसान झालेल्या आदिवासींची नोंद नाहीभूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यात असून, आतापर्यंत २.४ ते ४.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत. यामुळे अनेक शाळांसह दीड हजारांवर घरांना तडे गेले आहेत. दुर्गम भागातील आदिवासीपाड्यांतील घरांची नोंद अद्यापही सुरू आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे, परंतु आतापर्यंत कुणालाही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. विद्यार्थी शाळेत जायला तयार होत नसल्याने, त्यांचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होत आहे, परंतु मदत व पुनर्वसन विभागाने यासाठी भरीव मदत करण्याऐवजी केवळ १५ लाख रुपयांची मदत २८ फेबु्रवारीला वितरित केली. त्यातून तंबूसाठी ताडपत्र्या घ्याव्यात, असे स्पष्ट केले आहे. मग यामुळे घरांचे नुकसान झालेल्या रहिवाशांसह शाळांचे नुकसान कसे भरून काढावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

टॅग्स :palgharपालघर