शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांसह समर्थकांवर गुन्हे, २४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 02:56 IST

मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी केडीएमसीच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली.

कल्याण : मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी केडीएमसीच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली. यावेळी प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांनी थेट सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही नगरसेवकांसह त्यांच्या ३४ समर्थकांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी २४ जणांना अटक केली असून, कल्याण न्यायालयाने मंगळवारी त्यांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दीपेश म्हात्रे यांनी सोमवारी महासभेत पुलाचा मुद्दा मांडला, त्यावेळी शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी पुलाविषयी माहिती देत होते. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी त्यावर हरकत घेतली. दीपेश यांच्या शेजारी बसलेले त्यांचे भाऊ, नगरसेवक जयेश यांनी दीपेशला बोलू द्या, हरकत घेण्याचा विषय नाही, असे सांगितले. यावरून जयेश आणि रमेश म्हात्रे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी दीपेश आणि रमेश म्हात्रे यांनी दिलेल्या चिथावणीमुळे त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. समर्थकांंनी दमदाटी, धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून महासभेचे कामकाज बंद पाडले. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मल्लीनाथ डोके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यासह ३४ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करून २४ जणांना अटक केली.>गेल्यावर्षीही झाला होता असाच वादमार्च २०१७ मध्ये केडीएमसीच्या महासभेत अशीच घटना घडली होती. त्यावेळी महासभा सुरु असताना शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड वाद झाला होता. त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊ नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका