शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह दुर्घटनेची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:12 IST

‘वसतिगृहाचा स्लॅब कोसळल्याने आदिवासी मुलगी गंभीर जखमी’ या मथळ्याखाली लोकमतने २७ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने स्वत:हून (स्युओ मोटो) याचिका दाखल केली आहे.

- सुरेश लोखंडेठाणे  -  ‘वसतिगृहाचा स्लॅब कोसळल्याने आदिवासी मुलगी गंभीर जखमी’ या मथळ्याखाली लोकमतने २७ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने स्वत:हून (स्युओ मोटो) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान आदिवासी विकास विभागाने केलेल्या दाव्यानंतर ठाणे महापालिकेला नोटीस देण्याचा निर्णय घेऊन १० जुलै रोजी पुन्हा सुनावणीला बोलावले आहे.कोपरी परिसरात आदिवासी विकास विभागाच्या मालकीचे आदिवासी मुलींसाठी वसतिगृह आहे. येथे दीड महिन्यापूर्वी शौचालयाचा स्लॅब पडून एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानवाधिकार आयोगाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर एक सुनावणी नुकतीच झाली.आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव यांना या सुनावणीस बोलावले होते. मात्र, त्यांच्याऐवजी आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील मुख्य कार्यालयासह ठाणे येथील आदिवासी विकास विभागाचे विभागीय आयुक्त कार्यालय, शहापूर, डहाणू येथील प्रकल्प कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांची यावेळी सुनावणी झाली. लोकमतच्या प्रस्तूत प्रतिनिधीकडून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा अहवाल घेऊन मानवाधिकार आयोगाचे सभासद न्या. एम.ए. सईद यांनी या गंभीर समस्येवर प्रकाशझोत टाकल्याबद्दल लोकमतचे आभार मानले.या वसतिगृहाची दुरुस्ती न केल्यामुळे दुर्घटना घडली. वसतिगृहाच्या दुरुस्तीची जबाबदारी तुमची नाही का, तुम्ही बांधकाम विभागाकडे दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला नाही का, अशी विचारणा न्या. सईद यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. स्वत:ची इमारत नसल्यामुळे ठाणे महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत आदिवासी मुलींचे वसतिगृह भाडेतत्वावर सुरू आहे. ठाणे महापालिकेला त्या बदल्यात एक लाख दहा हजार रुपयांचे भाडे दरमहा दिले जात आहे. त्यात ७० आदिवासी विद्यार्थीनी वास्तव्यास आहेत.ठामपा जबाबदार असल्याचा युक्तिवादभाडे करारानुसार ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतीचे दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. त्यासाठी ३० ते ३५ पत्रे महापालिकेला दिली आहेत. यादरम्यान शौचालयाचा स्लॅब पडून विद्यार्थीनी जखमी झाल्याची कबुली देऊन, इमारतीच्या दुरुस्तीची जबाबदारी ठाणे महापालिकेची असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी यावेळी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.त्यानुसार ठाणे महापालिकेला नोटीस बजावून, १० जुलैला सुनावणीसाठी बोलावण्यात येत असल्याचे न्या. सईद यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या दुर्घटनेला ठाणे महापालिकेला जबाबदार धरण्यात येते की काय, याकडे लक्ष लागून आहे.विद्यार्थिनीसोबत नव्हता एकही कर्मचारी : एमएससीच्या दुसºया वर्षात शिक्षण घेत असलेली कांचन मोरे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली होती. कांचन जव्हार तालुक्यातील चालतवड या गावातील असून, ती ठाणे येथेबांदोडकर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. २६ मार्च रोजी साडे बारा वाजण्याच्या सुमारास शौचालयाचा स्लॅब तिच्या डोक्यात पडून ती जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत विद्यार्थिनींनी तिला सिव्हील रूग्णालयात त्वरित दाखल केले होते. वसतिगृहात व रूग्णालयातदेखील अधिक्षक, कर्मचारी आदींपैकी एकही या कालावधीत विद्यार्थीनींसोबत नव्हता, याकडेही आयोगाने लक्ष केंद्रीत करून ही याचिका दाखल करून घेतली आहे.

टॅग्स :thaneठाणे