शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पटसंख्या नोंदवणाऱ्या शाळांवर फौजदारी , शिक्षक-मुख्याध्यापक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:25 IST

सात वर्षांपूर्वी झालेल्या शाळांच्या पटपडताळणीमध्ये जिल्ह्यात बोगस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळले होते. ही बोगस पटसंख्या नोंदवणा-या शाळांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह संबंधित कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : सात वर्षांपूर्वी झालेल्या शाळांच्या पटपडताळणीमध्ये जिल्ह्यात बोगस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळले होते. ही बोगस पटसंख्या नोंदवणा-या शाळांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह संबंधित कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित शाळांचे धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यातील सातहजार शाळांची शालेय पटपडताळणीची सत्यता सात वर्षांपूर्वी सलग तीन दिवस तपासण्यात आली होती. त्यासाठी महसूल विभागाची मदत घेण्यात आली होती. यामध्ये पाच हजार ७१८ प्राथमिक शाळा आहे. बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवलेल्या शैक्षणिक संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींवर आता फौजदारी कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी शिक्षण संचालकांनी परिपत्रक जारी केल्यामुळे संबंधित शाळांवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांची दैनंदिन पटपडताळणी ठाणे जिल्ह्यात झाली. यामध्ये १५ तालुके, सात महानगरपालिका आणि पाच नगरपालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची पडताळणी जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील महसूल विभागाने केली. तीन दिवसांच्या या पडताळणीमध्ये वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांच्या बोटांना तीन हजार ६०० बॉटलमधील शाई लावण्यात आली. मतदानासाठी वापरण्यात येणारी ही शाई खास म्हैसूर येथून मागण्यात आली होती. या विद्यार्थी पटनोंदणीमध्ये सुमारे एक कोटी २५ लाख रुपये खर्च झाले. एक हजार ५५५ अधिकाºयांच्या ३० पथकांद्वारे ही पडताळणी करण्यात आली. राज्याच्या शिक्षण विभागाने या तपासणीसाठी गठीत केलेल्या पथकांमध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आदी जबाबदार अधिकाºयांचा समावेश होता. पटनोंदणी पडताळणीसाठी जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरून विद्यार्थी वाहतुकीवरदेखील अंकुश लावण्यात आला होता. त्यामुळे शाळांमध्ये बोगस विद्यार्थ्यांची उपस्थिती रोखण्यास मदत झाली. बोगस पटनोंदणीतून शासनाची फसवणूक करणाºया शाळांवर आता कोणत्याही क्षणी फौजदारी कारवाई होण्याचे संकेत आहेत.सलग तीन दिवस तपासणीठाणे जिल्ह्यातील सात हजार ३१९ शाळांमधील सुमारे २० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांची शालेय पटपडताळणीची सत्यता सात वर्षांपूर्वी सलग तीन दिवस तपासण्यात आली होती. त्यासाठी महसूल विभागाची मदत घेण्यात आली होती. यामध्ये पाच हजार ७१८ प्राथमिक शाळा आहेतयातील तीन हजार ५७९ शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या आहेत. याशिवाय, एक हजार ५८२ माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि आश्रमशाळांचाही समावेश आहे. त्यापैकी ५७६ शाळा अनुदानित आहेत. उर्वरित शाळा विनाअनुदानित असून तेथील विद्यार्थी पटसंख्याही बोगस आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे