शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीत विनाकारण फिरल्यास अध्यक्ष-सचिवांवर फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 01:00 IST

यापुढे कोणालाही इमारतीच्या गच्चीवर, कॉमन एरिया, पार्किंगच्या भागात एकत्रित येता येणार नाही.

ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ठाण्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाकडून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरूआहेत. याचाच एक भाग म्हणून आता महापालिकेने शहरातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार यापुढे कोणालाही इमारतीच्या गच्चीवर, कॉमन एरिया, पार्किंगच्या भागात एकत्रित येता येणार नाही. असे प्रकार आढळले तर संबंधित सोसायटीच्या अध्यक्ष तसेच सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील असे, महापालिकेने स्पष्ट केले.ही नियमावली महापालिकने शहरातील प्रत्येक सोसायटींना धाडली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक सोसायटीने काय करावे, काय करूनये याचे नियम सांगितले आहेत. त्यानुसार प्रत्येक सोसायटीचा अध्यक्ष आणि सचिव यांनी कोरोनाच्या दृष्टीने नियमावली तयार करून ती सोसायटीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. यात सोसायटीच्या कॉमन एरिया, पार्किंग व अन्य पेसेजमध्ये मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकसाठी कुणी जाऊ नये, सोसायटी आवारात विनाकारण फिरू नये, तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये याची काळजी घ्यावी, असेही नमूद केले आहे. सोसायटीच्या एखाद्या सदस्यानेदेखील या नियमावलीकडे दुर्लक्ष केले तर त्याच्यावर सुरुवातीला दंडात्मक कारवाई करावी, त्यानंतरही तो ऐकत नसेल तर त्याच्याविरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. सोसायटीमध्ये असलेल्या दुकाने, नर्सिंग होम, दवाखाने, औषध दुकाने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सोसायटीमधील एखादा नागरिक कोरोनाबाधित आढळला तर त्याच्या घरच्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये, असेही या नियमावलीत स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस