शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदेंच्या दीराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:39 IST

आपली जमीन बळकावल्याची तक्रार ठाण्यातील शेतकरी अशोक कवरे यांनी महापौरांचे दीर विजय शिंदे यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केली आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशाने चौकशीचे आदेश कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हाशेतकऱ्याची तक्रार

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांचे दीर विजय शिंदे आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध जमीन बळकावल्याचा आरोप अशोक कवरे या शेतक-याने केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर १५६ कलमान्वये बुधवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात शिंदे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.विजय शिंदे यांची महालक्ष्मी डेव्हलपर्स ही बांधकाम व्यवसाय करणारी कंपनी आहे. त्यांनी कासारवडवलीतील शेतकरी कवरे यांच्याकडून २००७ मध्ये ५१ गुंठे जमीन विकासासाठी घेतली होती. त्या मोबदल्यात कवरे यांना शिंदे हे ३१ लाख १५ हजार रुपये देतील, असे ठरले होते. त्यापैकी शिंदे यांनी चार लाख २५ हजार रुपये त्यांना धनादेशाद्वारे दिले. जमीन केवळ विकासासाठी दिलेली असतानाही शिंदे आणि त्यांचा सहकारी संदीप दळवी यांनी खरेदीखतामध्ये अफरातफर करून ती बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकाच मालकाने आपली जमीन तीन ते चार वेळा विकल्याचे प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत यात समोर आले आहे. १५६ नुसार हा गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

 

‘‘हे प्रकरण नेमके काय आहे, याबाबत माझ्याकडे माहिती नाही. न्यायालयातून दाखल झालेले असल्यामुळे योग्य ती चौकशी होईल. नेमके काय झाले, ते पाहावे लागेल.’’मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी