डोंबिवली : केडीएमसीचे ‘ई’ प्रभागाचे प्रभारी क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना जातीवाचक शिवीगाळ आणि त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक आणि विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्याविरोधात मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या दोन्ही नगरसेवकांनी आरोप फेटाळून लावले आहेत.‘पूर्वेतील नांदिवली परिसरातील एका ढाब्यावर कारवाई करून परतत असताना धात्रक यांनी मला गाठले. ते माझ्या गाडीत शिरून माझ्या बाजूला बसले. तसेच वाहनचालक सुरेश काटे याला धमकावत गाडी पुढे चालवण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी मला शिवीगाळही केली. हा प्रकार सुरू असताना आमच्या मागे हळबे यांची गाडी होती’, असा आरोप भांगरे यांनी केला आहे.धात्रक म्हणाले की, मी देखील भांगरे व काटे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तर, हळबे यांनी कायदेशीर उत्तर देणार असल्याचे सांगितले.
केडीएमसीच्या दोन नगरसेवकांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:23 IST