शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:49 IST

दुसरे लग्न केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सासू सासऱ्यांसह पतीविरुद्ध मानसिक आणि शारिरिक छळवणूकीची तक्रार दाखल करणा-या महिलेने बुधवारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्दे सासू सासरे पतीला भेटू देत नसल्याचा केला दावाटिटवाळा पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखलवैफल्यग्रस्त झाल्याने घेतला टोकाचा निर्णय

ठाणे: सासू सासरे आपल्या पतीला भेटून देत नाहीत. त्यामुळे मला जगायचे नाही, असे म्हणत थेट ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न करणा-या प्रिती त्रिदेव केणे (२४, रा. आंंबिवली, ठाणे) या महिलेविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.रिक्षा चालक असलेल्या त्रिदेव केणे (३०, रा. खडवली) याच्या बरोबर प्रितीचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झाले आहे. या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. घरातील कौटुंबिक वादातून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. यातूनच तिने पती आणि सासू सासºयांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात ४९८ ची तक्रार दाखल केली आहे. याच प्रकरणामध्ये पतीचे नाव वगळावे. केवळ सासू सासºयांचे नाव फिर्यादीमध्ये ठेवण्यात यावे, अशीही तिची मागणी आहे. माझे सासू सासरे हे पती त्रिदेव याला घेऊन गेले आहेत. त्याला भेटू देत नाहीत. त्यामुळे मला जगायचे नाही, असे म्हणत तिने १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हातातील काचेच्या तुकडयाने स्वत:च्या पोटावर वार करुन दुखापत करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. वैफल्यग्रस्त असल्याने तिने हा प्रकार केल्याची शक्यता असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे