शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

औषध निर्मिती शिक्षणाच्या बनावट पदव्या देणाऱ्या अधिष्ठातासह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 21:27 IST

बी आणि डी फार्मसीचे बनावट पदव्या देऊन प्रवेशाच्या नावाखाली एका विद्यार्थ्याची दोन लाख ६७ हजार ४०० रुपयांची रक्कम उकळणारा अधिष्ठाता पुरुषोत्तम तहीलरामानी आणि इतर संचालक मंडळाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. औषध निर्माणीसारख्या क्षेत्रात बनावट प्रमाणपत्रांचा वापर करुन रुग्णांच्या जीवाशी खेळणाºया या टोळीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १७ जणांना अटककापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणखी ७०० विद्यार्थ्यांचीही फसवणूक

ठाणे: वेगवेगळया विद्यापिठाच्या नावाखाली प्रवेश दाखवून बी आणि डी फार्मसीचे बनावट पदव्या देऊन प्रवेशाच्या नावाखाली एका विद्यार्थ्याची दोन लाख ६७ हजार ४०० रुपयांची रक्कम उकळणारा अधिष्ठाता पुरुषोत्तम तहीलरामानी आणि इतर संचालक मंडळाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे बिनधास्तपणे औषध विक्रीचा व्यवसाय करणा-या दुकानदार आणि त्यांना बनावट प्रमाणपत्रे देणा-या १७ जणांच्या टोळीला यापूर्वीच ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.कोलशेत येथील डिपोओझ नेट कॉलेजला डी आणि बी फार्मसी कॉलेजचे प्रशिक्षण घेण्याबाबतची कोणतीही अधिकृत मान्यता नव्हती. तरीही २०१६ पासून ते ८ जुलै २०१९ या तीन वर्षांच्या काळात राजस्थानचे ओपीजीएस विद्यापीठ आणि इतर विद्यापिठांच्या नावाने प्रवेश दाखवून ठाण्याच्या कोलशेत रोड मनोरमानगर येथील रहिवाशी असलेल्या उमाकांत यादव (२१) या तरुणाकडून दोन लाख ६७ हजार ४०० रुपयांची रोकड घेण्यात आली. याशिवाय, इतरही सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क घेऊन त्यांना बनावट गुणपत्रिका देऊन त्यांची फसवणूक केली. हा प्रकार उघड होताच याप्रकरणी नेट कॉलेजचे अधिष्ठाता पुरुषात्तम तहिलरामानी तसेच इतर संचालक मंडळाविरुद्ध ८ जुलै २०१९ रोजी फसवणूक आणि बनावट प्रमाणपत्र बनविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहीलरामानी याच्यासह १७ जणांना यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने यापूर्वीच फसवणूकीच्या अन्य एका प्रकरणात गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या प्रकरणात त्याची जामीनावर सुटका झाली आहे. त्याला आता या गुन्हयातही लवकरच अटक केली जाणार असल्याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी