शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांच्या बनावट सहया करुन १९ लाखांचा अपहार: ठाण्याच्या पतसंस्थेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:19 IST

ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेत ठेवलेली १९ लाख ३० हजारांची रक्कम घेण्यासाठी गेलेल्या रामचंद्र गुरव यांची रक्कम परस्पर सहया करुन व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खजिनदार दादासाहेब केसरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे शाखा व्यवस्थापक आणि खजिनदाराचा प्रतापश्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खजिनदाराला अटक

ठाणे: मुंबईतील रामचंद्र गुरव या खातेदाराने विश्वासाने ठेवलेल्या १९ लाख ३० हजारांच्या रकमेचा ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खजिनदार दादासाहेब केसरे (२७) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.गुरव यांनी १७ एप्रिल २०१७ रोजी त्यांच्या स्वत:च्या त्यांची दोन्ही मुले, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील बवत खात्यात धनादेशाद्वारे १९ लाख ३० हजारांची रक्कम जमा केली होती. ही रक्कम दुसऱ्याच दिवशी १८ एप्रिल रोजी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश नलावडे आणि खजिनदार दादासाहेब केसरे यांनी आपसात संगनमत करुन रामचंद्र गुरव यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, लहान भाऊ शंकर आणि त्याची पत्नी यांच्यापैकी कोणाचीही लेखी परवानगी किंवा संमतीपत्र न घेताच त्यांच्या बनावट सहया करुन त्यांच्या बचत खात्यातील रक्कमेची परस्पर एफडी केली. त्याच एफडीवर ठेवतारण कर्ज घेऊन ती रक्कम पुन्हा त्यांच्या बचत खात्यात जमा केली. आरोपी नलावडे आणि केसरे यांनी गुरव कुटूंबियांच्या बनावट स्वाक्षºया करुन १८ एप्रिल २०१७ ते १५ सप्टेंबर २०१७ या मुदतीमध्ये पैसे काढून त्यांची १९ लाख ३० हजारांची फसवणूक केली. सुरुवातील गुरव यांनी याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. याच तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये या अपहाराचा प्रकार उघड झाल्याने याप्रकरणी अपहार, फसवणूकीचा गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात ११ आॅगस्ट रोजी दाखल केला आहे. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केसरेला अटक करण्यात आली असून प्रकाशचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या बचत खात्यात ठेवलेली १९ लाख ३० हजारांची रक्कम काढण्यासाठी रामचंद्र गुरव पतसंस्थेत गेले होते. या पतसंस्थेतून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यांनी कंटाळून याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या चौकशीतून हा अपहार उघड झाला. आरोपी खजिनदाराला अटक झाली असून त्याचा साथीदार शाखा व्यवस्थापक प्रकाश नलावडे यालाही चौकशीनंतर अटक केली जाणार आहे.सुलभा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे 

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाfraudधोकेबाजी