शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 12:46 AM

महापौरांची मागणी : ठामपा आयुक्तांना दिले पत्र

ठाणे : महाराष्ट्र शासनाने मार्चमध्ये शासन निर्णय जारी करून कोविड रुग्णालयांमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करून त्यांना वेगवेगळी प्रवेशद्वारे ठेवण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. यात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या आजारांपैकी तीव्र स्वरूपाचे रुग्ण कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तातडीने भरती करून नंतर त्यांची तपासणी करून निगेटिव्ह आढळल्यास त्यांना नॉन-कोविड हॉस्पिटलमध्ये हलवावे, असे स्पष्ट निर्देश आहेत. या निर्देशांचे पालन करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी पत्राद्वारे शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली.

मागील जवळजवळ पाच महिन्यांच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेमार्फत कोविड साथ नियंत्रण मोहीम सुरू आहे. या कालावधीत अनेक अत्यवस्थ रुग्णांना नॉन-कोविड रुग्णालयांमध्ये भरती होणे भाग पडले. उच्चभ्रू अथवा मध्यमवर्गीय रुग्णांच्या कुटुंबीयांनादेखील सुरुवातीच्या काळात हाती पैसा नसताना खाजगी रुग्णालयांमध्ये होणारा खर्च परवडणारा नव्हता. गरीब व गरजू रुग्णांना अस्वस्थतेमुळे भरती होणे गरजेचे असताना, कोविड रुग्णालयामध्ये फक्त पॉझिटिव्ह रुग्णांना अ‍ॅडमिट करत असल्यामुळे आणि अभावानेच उपलब्ध असलेल्या नॉन-कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यामुळे बहुतांश रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना विविध समस्यांना सामोरे जाणे भाग पडले, हे वास्तवही त्यांनी आयुक्तांकडे उघड केले आहे.आज सुदैवाने तत्काळ रिपोर्ट उपलब्ध होणारी अ‍ॅण्टीजेन टेस्ट उपलब्ध आहे. परंतु, अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा दोन दिवस आरटी-पीसीआर टेस्टच्या रिपोर्टसाठी थांबणे भाग पडते. कोविड आजारामध्ये एका दिवसात पेशंटची परिस्थिती खालावू शकते. अशा तºहेने टेस्टचा रिपोर्ट नसल्यामुळे पेशंटला अ‍ॅडमिट करून घेतले जात नाही. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना जीव धोक्यात घालून घरी राहणे भाग पडते, अशी खंतही त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.८४ टक्के रिकव्हरी रेटबद्दल महापौरांनी मानले आभारशहरातील कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ८४ टक्क्यांवर आले असून ही नक्कीच ठाणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. ठाण्यातील कोरोना आटोक्यात यावा, यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, लोकप्रतिनिधी व आपणासह आपल्या सर्व सहकाऱ्यांचे ठाणेकरांतर्फे अभिनंदन करून त्यांनी आभारही मानले आहेत.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण