शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

ठाण्यात वडिलांच्या खूनप्रकरणी मुलाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने वर्षभरानंतर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:02 IST

आपल्याच वडिलांना लहान भाऊ विलास याने घरातच उपाशीपोटी डांबून ठेवून त्यांचा खून केल्याचा आरोप मोठा भाऊ दिलीप पाटील याने केला आहे. याप्रकरणी त्याने न्यायालयात दाद मागितल्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देकासारवडवली पोलीसांना आदेशमोठयाने केली लहान भावाविरुद्ध तक्रारपेट्रोल पंपावरील वाटणीचा वाद

ठाणे : जन्मदात्या वडिलांना उपाशीपोटी घरात डांबून ठेवून वर्षभरापूर्वी त्यांचा खून केल्याचा आरोप दिलीप पाटील (५४) यांनी धाकटा भाऊ विलास आणि भावजयीवर केला आहे. त्यांनी ठाणे न्यायालयात दाद मागितल्यानंतर कलम १५६ (३) अन्वये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने कासारवडवली पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे तब्बल वर्षभरानंतर वडिलांच्या खुनाचा गुन्हा मुलाविरुद्ध दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र पाटील (८५) यांच्या मालकीचा कासारवडवली नाक्यावर एचपीसीएल कंपनीचा पेट्रोलपंप आहे. याच पेट्रोलपंपाच्या मालकीवरून दिलीप आणि विलास या दोन्ही मुलांसह वडिलांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होता. या मालमत्तेमधील हरिश्चंद्र यांच्याकडे काही टक्के, तर दिलीप यांच्याकडे काही टक्के हिस्सा होता. पण, हरिश्चंद्र यांचे मोठा मुलगा दिलीप याच्याशीही बिनसले होते. त्यामुळेच ते धाकटा मुलगा विलास याच्याकडे वास्तव्याला होते. मध्यंतरीच्या काळात हरिश्चंद्र यांचे १५ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले. त्याचवेळी वडिलांना भेटू न दिल्याचा तसेच त्यांना उपाशी ठेवून हळूहळू विष देऊन मारहाण करून मारल्याचा आरोप दिलीपने विलासवर केला होता. यासंदर्भात त्यांनी अलीकडेच कासारवडवली पोलिसांकडेही तक्रार दिली होती. कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपींनी एकमेकांविरुद्ध मालमत्तेवरील वादाबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.दिलीप पाटील यांनी आता न्यायालयात धाव घेऊन याप्रकरणी धाकटा भाऊ विलास आणि त्याच्या पत्नीविरुद्ध २८ सप्टेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौकशी सुरू असून न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून