शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दाम्पत्याने आत्महत्या, आर्थिक परिस्थितीमुळे टोकाचा निर्णय, दोन्ही मुले पोरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 12:24 IST

राजीव गांधीनगर परिसरात राहणारे सचिन सुरेश सुतार फर्निचरचे, तर पत्नी शर्वरी घरकाम करीत होती. त्यांना पराग व यशार्थ अशी ५ ते ६ वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने, घरात आर्थिक अडचण जाणवत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. 

उल्हासनगर: कॅम्प नं. १, शहाड फाटक परिसरातील राजीव गांधीनगरमध्ये राहणाऱ्या सचिन सुतार व त्यांची पत्नी शर्वरी यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. रविवारी सकाळी त्यांची दाेन लहान मुले झोपेतून उठल्यानंतर त्यांनी घराचे दार उघडून झालेला प्रकार शेजारील नागरिकांना सांगितला. आर्थिक विवंचनेतून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.राजीव गांधीनगर परिसरात राहणारे सचिन सुरेश सुतार फर्निचरचे, तर पत्नी शर्वरी घरकाम करीत होती. त्यांना पराग व यशार्थ अशी ५ ते ६ वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने, घरात आर्थिक अडचण जाणवत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. दरम्यान, दिवाळीनिमित्त रत्नागिरी येथील गावी गेलेले सुतार कुटुंब शनिवारी (दि. २०) परत आले. स्थानिक रहिवासी व मनसेचे माजी शहर, जिल्हाध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना दिली. शनिवारी मध्यरात्री मुले झोपल्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मुले झोपेतून उठल्यावर त्यांना आई-वडील मृतावस्थेत दिसले. त्यांनी घराचे दार उघडून शेजाऱ्यांना ही माहिती दिल्याने परिसरात खळबळ उडाली.

परिसरात हळहळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. सचिन सुतार यांचे आई-वडील व भाऊ डोंबिवली येथे राहत असून, त्यांना बोलावून घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. आई-वडिलांच्या आत्महत्येने दोन्ही मुले अनाथ झाली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे